आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या पार्श्वभूमीवर (IPL 2020) टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने क्रिकेट चाहत्यांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. जिओने आपल्या ‘Dhan Dhana Dhan’ ऑफरअंतर्गत हे दोन प्लॅन आणले आहेत. जिओने 499 रुपये आणि 777 रुपयांचे दोन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. तसं बघायला गेलं तर एका वर्षाचं फक्त ‘डिज्नी+हॉटस्टार VIP’ सबस्क्रिप्शन घेण्यासाठी युजर्सना 399 रुपये मोजावे लागतात. पण या दोन्ही प्लॅनमध्ये एका वर्षापर्यंत Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे. आयपीएलचे सर्व सामने तुम्ही हॉटस्टारवर लाइव्ह पाहू शकतात.

499 रुपयांचा प्लॅन :-
कंपनीचा हा ‘डेटा ओन्ली टॉप अप’ प्लॅन आहे. म्हणजे यामध्ये ग्राहकांना फक्त डेटा वापरण्यास मिळतो, व्हॉइस कॉलिंगची सेवा यामध्ये मिळणार नाही. या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा वापरण्यास मिळतो. 56 दिवसांची वैधता या प्लॅनची आहे, म्हणजे एकूण 74GB डेटा या प्लॅनमध्ये मिळतो. याशिवाय एका वर्षासाठी Disney+ Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं.

777 रुपयांचा प्लॅन :-
जिओच्या 777 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. कंपनी या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज  1.5GB डेटा देत आहे.  एकूण 131GB डेटा युजर्सना या प्लॅनमध्ये मिळतो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळतं. या प्लॅनमध्येही एका वर्षासाठी Disney+ Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

19 सप्टेंबरपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिओने आपल्या युजर्ससाटी हे दोन खास प्लॅन आणले आहेत.