News Flash

‘सॅमसंग’चा ढासू स्मार्टफोन , दिवसभर टिकणार अवघ्या 30 मिनटांची चार्जिंग

'सुपर स्टेडी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी'सह भारतातील पहिलाच स्मार्टफोन

Samsung Galaxy S10 Lite हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. सॅमसंग Galaxy S10 Lite स्मार्टफोन प्रिज्म ब्लू, प्रिज्म व्हाइट आणि प्रिज्म ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनसाठी आजपासूनच फ्लिपकार्ट आणि Samsung.com वर प्री-बुकिंगलाही सुरूवात झाली असून तीन फेब्रुवारीपर्यंत बुकिंग करता येईल. मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये ‘सुपर स्टेडी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आला आहे. या टेक्नॉलॉजीसह आलेला हा भारतातील पहिलाच फोन असल्याचं कंपनीने म्हटलंय. या टेक्नॉलॉजीमुळे ग्राहकांना कॅमेऱ्याचा दर्जेदार अनुभव मिळतो.

ऑफर – प्री-बुकिंग ऑफरअंतर्गत युजर्सना 1,999 रुपयांमध्ये वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट फायदा मिळेल. Samsung Galaxy S10 Lite स्मार्टफोनची विक्री 4 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, Samsung.com आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये होईल. लॉंच ऑफरअंतर्गत ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 3,000 रुपये कॅशबॅकची ऑफर आहे.

स्टोरेज – Samsung Galaxy S10 Lite स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. माइक्रोएसडी कार्डद्वारे फोनची स्टोरेज मेमरी 1TB पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच फुल HD+ सुपर AMOLED Infintiy-O डिस्प्ले आहे. याशिवाय यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 ऑक्टा-कोर प्रोसेसर असून 25W सुपर फास्ट चार्जरसह 4,500 mAh क्षमतेची बॅटरी दिलीये. अवघ्या 30 मिनिटांच्या सुपर फास्ट चार्जिंगनंतर फोनची बॅटरी दिवसभर टिकते असा कंपनीने दावा केला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये ऑन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे.

आणखी वाचा – शाओमीच्या ‘पॉवरफुल’ फोनवर डिस्काउंट, कंपनीकडून 3,000 रुपयांची सवलत

फोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा – Samsung Galaxy S10 Lite स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. म्हणजे फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेरे असून यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून सुपर स्टेडी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी असलेला हा भारतातील पहिलाच फोन असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

किंमत – सॅमसंगच्या या शानदार स्मार्टफोनची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 3:37 pm

Web Title: samsung galaxy s10 lite launched in india know price specifications and all offers sas 89
Next Stories
1 श्वानाने दिला हिरव्या रंगाच्या पिल्लाला जन्म, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
2 पॅन-आधार लिंक नसेल तरी ‘नो टेंशन’, उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
3 केवळ 10 रुपयांत 1GB डेटा आणि कॉलिंगही, जिओची भन्नाट ऑफर
Just Now!
X