News Flash

दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

दुपारी एक वाजता निकाल होणार जाहीर

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृतरित्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in वर उपलब्ध होणार आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत. दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचे गुण आता इतर विषयांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या सरासरीनुसार दिले जाण्याची शक्यता आहे.

कुठे पाहाल निकाल ?

mahresults.nic.in
maharashtraeducation.com
results.mkcl.org
mahahsscboard.maharashtra.gov.in

कसा पाहाल निकाल?

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वरती दिलेल्या संकेतस्थळावर जा.
– त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 12:00 pm

Web Title: ssc result 2020 steps to check results online on official website nck 90
टॅग : Maharesult
Next Stories
1 चिकन बिर्याणी की, मसाला डोसा? लॉकडाउनमध्ये भारतीयांनी कुठल्या पदार्थाची सर्वात जास्त ऑर्डर दिली?
2 पावसाळ्यात जपा पायांचं सौंदर्य; घ्या ‘ही’ काळजी
3 पावसाळ्यात उद्भवणा-या श्वसनाच्या समस्यांपासून असे रहा दूर!
Just Now!
X