News Flash

लिंबू फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? फायदे, तोटे आणि उपाय

लिंबू बरेच काळ ताजे राहण्यासाठी खालील टिप्स नक्कीच वाचा...

लिंबू ठेवण्याचे योग्य मार्ग..

कोणतीही गोष्टी बरेच दिवस नीट ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे फ्रीज. मात्र, अनेकांना असे वाटते की सगळ्याच गोष्टी या फ्रीजमध्ये ठेवल्याने त्या बरेच दिवस ताज्या राहतात. यामुळे फ्रीजमध्ये ठेवू नये अशा वस्तू देखील ते फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करतात. अनेक लोक एकत्र जास्त लिंबू खरेदी करतात आणि जास्त काळ ताजे रहावे म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात. पण लिंबू फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? तर चला आज आपण लिंबू ठेवण्याचा योग्य मार्ग जाणून घेऊया..

१. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लिंबू कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण त्यामुळे लिंबू कडक होतात आणि त्यांचा रस देखील कमी होतो.

२. लिंबासोबतच सिट्रिक एसिड असणाऱ्या फळांसाठी कमी तापमान अनुकूल नसते. त्यामुळे त्यांच्यावर डाग येतात आणि त्यांची चव निघून जाते. तर, त्यांच्यात असलेला रस देखील कमी होतो.

आणखी वाचा : तांदूळ शिजवण्याआधी उकळत्या पाण्यात ‘या’ दोन गोष्टी टाका अन् भात चिकटण्याची समस्या टाळा

३. तरी देखील तुम्हाला लिंबू फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज असेल तर ते प्लास्टिकच्या किंवा कागदाच्या पिशवीत ठेवू शकतात.

४. वर्षभर लिंबू साठवूण ठेवण्यासाठी, बर्फाच्या ट्रेमध्ये लिंबाचा रस टाकून त्याचा बर्फ तयार करा, त्यानंतर त्याचे क्युब फ्रीजरमध्ये ठेवू शकतात. या पद्धतीचा वापर केल्यास तुम्हाला वर्षभर लिंबाचा रस साठवूण ठेवता येईल.

५. जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये थोड्या थोड्यावेळात लिंबूपाणी पिण्याची इच्छा होतं असेल आणि सारखं लिंबूपाणी तयार करण्यासाठी कंटाळ येत असेल. तर तुम्ही १ कप लिंबाचा रस आणि ३ कप साखर मिक्स करा. ते मिश्रण एका काचेच्या बाटलीत भरुन ठेवा. यामुळे ते बरेच दिवस फ्रीजमध्ये राहू शकतं. जेव्हा तुम्हाला लिंबूपाणी पिण्याची इच्छा होईल तेव्हा १-२ चमचे रस घ्या, त्यात पाणी आणि बर्फाचे क्युब टाका आणि तुमचे लिंबूपाणी तयार.

आणखी वाचा : मैदा, बेसन आणि पीठाला कीडं लागत असेल तर करा ‘या’ गोष्टी

६. लिंबू अनेक दिवस ठेवण्यासाठी त्यावर थोड मोहरी किंवा रिफाइंड तेल लावून एका कंटेनरमध्ये ठेवा, असे केल्याने लिंबू लवकर खराब होणार नाहीत.

आणखी वाचा : लिंबाच्या सालीचे फायदे ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या काय आहेत फायदे

७. लिंबात ‘विटामिन सी’ मोठ्या प्रमाणात असते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. एवढंच नाही तर वजन कमी होण्यास देखील याची मदत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 11:43 am

Web Title: tips how to keep lemon fresh for long time is it safe to store in fridge dcp 98
टॅग : Health News,Lifestyle
Next Stories
1 जाणून घ्या कॉफीचे “पाच” फायदे
2 पावसाळ्याच्या दिवसात या गोष्टींकडे दुर्लक्ष केलात तर पडाल आजारी
3 भांड्यावरील स्टिकर निघत नसेल तर वापरा या ५ सोप्या टिप्स
Just Now!
X