scorecardresearch

तांदूळ शिजवण्याआधी उकळत्या पाण्यात ‘या’ दोन गोष्टी टाका अन् भात चिकटण्याची समस्या टाळा

भात बनवण्याची सोपी पद्धत नक्कीच पाहा.

simple trick to make perfect cooked rice
भात बनवण्याची सोपी पद्धत नक्कीच पाहा.

भारतीय जेवणात वरण-भात आणि पोळीला अत्यंत महत्त्व आहे. हे पदार्थ जवळजवळ प्रत्येक घरात बनवले जातात. भात हा त्यापैकी मुख्य अन्न पदार्थ आहे. मोठ्या प्रमाणात भाताचे सेवन केले जात असले तरी देखील भात बनवणे कठीण आहे. कधी भातात कमी पाणी होतं तर कधी जास्त होतं. कधी भात कच्चा राहतो तर भात जास्त मऊ होतो. आज आम्ही तुम्हाला भात शिजवण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत. भात चिकटायला नको म्हणून या दोन गोष्टी टाका आणि भात चिकटण्याची समस्या टाळा.

आणखी वाचा : दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ ५ गोष्टींचे सेवन

एक कप तांदळाला टोपात काढून घ्या.

त्यानंतर या तांदूळ २-३ वेळा साध्या पाण्याने धुवा.

मग एका टोपात पानी घ्या आणि गॅसवर ठेवा. त्या पाण्याला उकळी येऊ द्या.

आता त्यात धुतलेले तांदूळ घाला आणि एका चमच्याने त्या तांदळाला चाळून घ्या.

आता उकळी आल्यावर त्यात एक चमचा लिंबूचा रस आणि एक चमचा तूप घाला.

आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार

लिंबाचा रस आणि तूप घातल्यामुळे तांदळाचे कण एकमेकांना चिटकणार नाहीत.

आता त्यावर एक प्लेट ठेवा आणि तांदळाला शिजू द्या.

थोड्यावेळाने भाताचे एक-दोन कण काढून ते चिकटले नाही ना हे बघा.

आणखी वाचा : मैदा, बेसन आणि पीठाला कीडं लागत असेल तर करा ‘या’ गोष्टी

जर, भाताचे कण दाबल्यानंतर तुटत असतील तर समजा की भात तयार झाला आहे आणि भात पाण्यातून बाहेर काढा.

अशा प्रकारे तुमचा भात हा चिकटणार नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-06-2021 at 18:59 IST