जर तुम्हालाही नेटफ्लिक्सवर सिनेमे किंवा वेब सीरिज बघायची असेल, पण सबस्क्रिप्शन महाग असल्याने बघू शकत नसाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नेटफ्लिक्सने Netflix StreamFest अंतर्गत ५ आणि ६ डिसेंबर रोजी मोफत सेवा दिली होती. आता पुन्हा एकदा कंपनी अशीच ऑफर आणली आहे.

नव्या ऑफरनुसार, युजर्स ९ ते ११ डिसेंबरपर्यंत नेटफ्लिक्सवरील कंटेट मोफत पाहू शकणार आहेत. कालपासून सुरू झालेल्या या ऑफरचा लाभ ११ डिसेंबर म्हणजे उद्या सकाळी ८.५९ वाजेपर्यंत घेता येईल. कंपनी मोफत कंटेंट पाहण्याची संधी देत असली तरी, या मोफत सेवेचा लाभ घेणाऱ्या युजर्सना एचडी नव्हे तर केवळ स्टँडर्ड डेफिनेशन (480p) असलेला कंटेंटच पाहता येईल. स्ट्रीमफेस्टदरम्यान जर युजर्सना डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर नेटफ्लिक्सचे शो किंवा सिनेमे बघायचे असतील तर त्यांना ब्राऊझरमधून http://www.netflix.com/in/streamfest ही लिंक ओपन करावी लागेल. ई-मेल, नाव, फोन नंबर आणि पासवर्ड टाकून साइन-अप केल्यानंतर नेटफ्लिक्सवरील कंटेंट मोफत बघता येईल.

नेटफ्लिक्स प्लॅन्स :-
नेटफ्लिक्सकडे भारतीय युजर्ससाठी अनेक प्लॅन्स आहेत.यातील सर्वात स्वस्त प्लॅ मोबाइलसाठी आहे. दरमहा १९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये एसडी क्वालिटीमध्ये कंटेंट पाहता येईल. याशिवाय ६४९ रुपयांच्या स्टँडर्ड प्लॅनमध्ये युजर्स एकाच वेळी दोन वेगवेगळ्या डिव्हाइसवर नेटफ्लिक्स पाहू शकता. तर, दरमहा ७९९ रुपयांच्या प्रीमियम प्लॅनमध्ये 4K+HDR क्वालिटी पिक्चर्स बघता येतील. हा एकप्रकारचा फॅमिली प्लॅन आहे. कारण, या प्लॅनमध्ये एकाच वेळी चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर नेटफ्लिक्स बघता येईल.