निसर्गाने आपल्याला वेगवेगळ्या चवींची, वेगवेगळ्या गुणधर्माची फळं बहाल केलेली एक महत्त्वाची देणगी आहे. ही फळं वेगवेगळ्या विकारांमध्ये गुणकारी आहेतच शिवाय आरोग्यवान होण्यासाठीही ती उपयुक्त आहेत. काही फळे ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. मात्र ती सोलण्यासाठी किंवा कापण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. यातलीचं काही उदाहरणं घ्याची झालं तर, फणस,डाळिंब, मोसंबी, कवठ ही फळं अत्यंतच चवदार आणि शरीसासाठी गुणकारी असतात. मात्र त्यांना सोलणं अत्यंत कठीण असते. त्यातच डाळिंब हे ताप आल्यास अत्यंत फायदेशीर फळ आहे. परंतु ते सोलणं कठीण असल्यामुळे ते खाण्यास अनेक जण टाळाटाळ करतात. परंतु डाळिंब सोलण्याच्या काही भन्नाट पद्धती आहेत. ज्या ट्राय केल्यानंतर तुम्ही नक्कीच डाळिंब आवडीने खाल.

डाळिंब सोलण्याची पद्धत
डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर रस असतो. त्यामुळे ते सोलताना कपड्यावर त्याचे डाग पडू शकतात. यासाठी डाळिंब सोलण्यापूर्वी त्याला चॉपिंग बोर्ड ठेवा. त्यानंतर डाळिंबाच्या वरच्या भागावर असलेला भाग थोडासा कापावा. हा भाग कापल्यानंतर डाळिंबाच्या आतील पांढरा भाग आणि डाळिंबाचे दाणे दिसू लागतील. यामध्ये जो पांढरा भाग आहे त्यातील मधला भाग प्रथम काढावा. त्यानंतर ज्या पांढऱ्या रंगाच्या रेषा आहेत त्या सुरीच्या मदतीने कापाव्यात. परंतु त्या कापत असतांना आतपर्यंत कापू नये. असं केल्यास डाळिंबाचे दाणे मधून कापले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पांढरा भाग हलक्या हाताने कापावा. त्यानंतर डाळिंबाचे वेगवेगळे चार भाग करुन दाणे अलगद काढून घ्यावेत.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
how to make jackfruit sabzi recipe
Recipe : तेल न लावता, हात चिकट न करता चिरा भाजीसाठी फणस! ट्रिक आणि रेसिपी दोन्ही पाहा

दरम्यान, महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे डाळिंबाचं पिक घेतलं जातं. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. तसंच डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर त्याचं साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करण्यात येतो.