07 August 2020

News Flash

एकाच नंबरवरुन अनेक डिव्हाइसवर वापरता येणार WhatsApp, लवकरच रोलआउट होणार नवं फीचर

एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनेक डिव्हाइसवर...

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपकडून आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणले जातात. आता पुन्हा एकदा कंपनी दोन शानदार फीचर्स घेऊन येत आहे. एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता यावं या फीचरवर WhatsApp कडून दीर्घ काळापासून काम सुरू आहे. आता लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाण्याची शक्यता आहे. या फीचरद्वारे युजर्सना एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटचा वापर अनेक डिव्हाइसवर करता येणार आहे.

WhatsApp चे फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन अँड्रॉइड बीटा अपडेट जारी केलं आहे. Android साठी या लेटेस्ट व्हॉट्सअ‍ॅप v2.20.196.8 अपडेटमध्ये दोन नवीन फीचर्स आहेत. यात अ‍ॅडव्हान्स सर्च मोड आणि मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट यांचा समावेश आहे. एक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता येईल अशा मल्टीपल डिव्हाइस सपोर्ट या फीचरवर कंपनीकडून दीर्घ काळापासून काम सुरू होतं. WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅपच्या v2.20.196.8 Beta या अपडेटमधील नवीन फीर्सबाबतची माहिती दिली आहे. यानुसार, मल्टिपल डिव्हाइस सपोर्टसाठी ‘ ‘Linked Devices’ नावाचं एक वेगळं सेक्शन देण्यात आलं आहे. हे सेक्शन व्हाट्सअ‍ॅपच्या मेन्यूमध्ये दिलंय. या फीचरमुळे एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटचा वापर अनेक डिव्हाइसवर करता येणार आहे. या अपडेटमुळे एकाचवेळी चार डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येईल असं समजतंय. सध्या हे फीचर केवळ बीटा व्हर्जनमध्येच उपलब्ध आहे. पण लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाईल अशी शक्यता आहे.


या फीचरवर सध्या कंपनीकडून काम सुरू आहे. सध्या हे फीचर केवळ बीटा अपडेमध्ये आलं आहे, पण बीटा युजर्सनाही टेस्टिंगसाठी अद्याप हे फीचर उपलब्ध करण्यात आलेलं नाही. त्यामुळे बीटा अपडेट डाउनलोड केल्यानंतरही युजर्सना हे फीचर दिसणार नाही. मात्र टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर हे फीचर सर्व युजर्ससाठी जारी केलं जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 1:27 pm

Web Title: whatsapp multiple device feature spotted in latest beta version may be called linked devices get details sas 89
Next Stories
1 4G स्पीड : Jio ने सर्व स्पर्धक कंपन्यांवर केली मात, व्होडाफोन-आयडियानेही केली कमाल
2 स्वस्त झाले Mi True Wireless Earphones 2 , जाणून घ्या नवी किंमत
3 Redmi Note 9 चा आज पहिलाच ‘सेल’, किंमत 11 हजार 999 रुपये
Just Now!
X