21 September 2020

News Flash

WhatsApp मध्ये आलं शानदार फीचर, आता पाठवता येणार ‘अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स’

WhatsApp वरील चॅटिंग होणार अजून मजेशीर...

(संग्रहित छायाचित्र)

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर युजर्ससाठी सतत नवनवे फीचर्स येत असतात. आता WhatsApp साठी कंपनीने अजून एक शानदार फीचर आणलं आहे. या फीचरद्वारे युजर्सचा चॅटिंगचा अनुभव अजून मजेशीर करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या फीचरवर WhatsApp ची टेस्टिंग सुरू आहे अशी चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून होती. आता हे फीचर कंपनीने युजर्ससाठी रोलआउट करण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवीन फीचर अँड्रॉइड आणि आयओएसच्या beta व्हर्जनच्या युजर्ससाठी रोलआउट करण्यास कंपनीने सुरूवात केली आहे.

कंपनीने अँड्रॉइड आणि आयओएस बीटा अ‍ॅप युजर्ससाठी Playful Piyomaru नावाचे पहिले अ‍ॅनिमिटेड स्टिकर पॅकही रिलीज केले आहे. 2.8 MB इतक्या साइजचे हे पहिले अ‍ॅनिमिटेड स्टिकर पॅक आहे. अँड्रॉइड बीटा अ‍ॅप युजर्स व्हर्जन 2.20.195.1 ला रोलआऊट करुन नवीन फीचरचा वापर करु शकतील. तर आयफोन बीटा अ‍ॅप युजर्सना हे फीचर वापरण्यासाठी बीटा व्हर्जन 2.20.70.26 डाउनलोड करावे लागेल. लवकरच हे फीचर कंपनी सर्व युजर्ससाठी रोलआउट करण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 3:44 pm

Web Title: whatsapp new fun animated stickers to android ios beta users get details sas 89
Next Stories
1 OnePlus चा सर्वात ‘स्वस्त’ फोन, प्री-बुकिंगला होणार सुरूवात
2 फेसबुकवर आता बनवा स्वतःचा ‘अ‍ॅनिमेटेड अवतार’, आलं मजेशीर फीचर
3 Redmi Note 9 Pro Max खरेदी करण्याची पुन्हा संधी, ‘सेल’मध्ये आहेत शानदार ऑफर्स
Just Now!
X