News Flash

चॅटिंग होणार आणखी सोपं, व्हॉट्स अॅपचे दोन नवे फिचर

फोनच्या बॅटरीचीही या फिचरमुळे बचत होणार

व्हॉट्स अॅप आपल्या युजर्ससाठी अॅपमध्ये वेळोवेळी बदल करत असतं. कंपनी पुन्हा एकदा अॅपमध्ये नवे फिचर आणण्याच्या तयारीत आहे. ‘स्वाइप टू रिप्लाय’ आणि ‘डार्क मोड’ अशी या फिचरची नावं आहेत. स्वाइप टू रिप्लाय हे फिचर आयफोनसाठी आधीच जारी करण्यात आलं असून लवकरच आता अॅन्ड्रॉइडसाठीही ते उपलब्ध होणार आहे.

स्वाइप टू रिप्लाय या फिचरची कंपनीकडून सध्या चाचणी सुरू असल्याची माहिती आहे. याद्वारे कोणालाही तातडीने रिप्लाय देता येणार आहे. आलेल्या मेसेजला केवळ स्वाइप करुन संबंधित व्यक्तीला रिप्लाय देता येईल. याशिवाय युजर्सच्या डोळ्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून व्हॉट्सअॅप खास फिचर दाखल करण्याच्या तयारीत आहे. ‘डार्क मोड’ असं या फिचरचं नाव आहे. या फिचरबाबत अनेक दिवसांपासून चर्चा आहे. यामुळे यूजर्सच्या डोळ्यांकरील ताण कमी होणार आहे. रात्रीच्या वेळी कमी प्रकाशातही डोळ्यांवर ताण न देता व्हॉट्स अॅपचा वापर करता येणार आहे. इतकंच नाही तर फोनच्या बॅटरीचीही या फिचरमुळे बचत होणार. आयफोन आणि अॅन्ड्रॉइड दोन्हींसाठी एकाचवेळी हे फिचर जारी केलं जाणार असल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 12:30 pm

Web Title: whatsapp will bring swipe to reply and dark mode feature soon
Next Stories
1 ८वी पास आमदारांचे वार्षिक उत्पन्न ९० लाख
2 तृतीयपंथीयाशी प्रेमसंबंध, वडिलांची मारहाण अन् जमावासमोर कपडे उतरवून हंगामा !
3 जगप्रसिद्ध ‘Time Magazine’ ची 19 कोटी डॉलरला विक्री
Just Now!
X