Xiaomi चा Redmi Note 9 Pro हा स्मार्टफोन आज(दि.28) पुन्हा एकदा ‘फ्लॅश सेल’मध्ये खरेदी करण्याची संधी आहे. दुपारी 12 वाजेपासून या फोनच्या विक्रीसाठी अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर सेल सुरू होत आहे. सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. कंपनीने मार्चमध्ये Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max हे दोन फोन लाँच केले होते. यातील  Redmi Note 9 Pro Max साठीही उद्या सेल असणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच कंपनीने या सीरिजमधील आपला नवीन स्मार्टफोन Redmi Note 9 हा देखील लाँच केला आहे.

रेडमी नोट 9 प्रो स्पेसिफिकेशन्स : या फोनमध्ये मागील बाजूला 48MP प्रायमरी सेन्सरसह चार कॅमेऱ्यांचा सेटअप आणि 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. दोन व्हेरिअंटमध्ये भारतीय बाजारात आलेला Redmi Note 9 Pro ऑरोरा ब्लू, ग्लेशिअर व्हाइट, आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेडमी नोट 9 प्रोमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ IPS डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यात लेटेस्ट MIUI व्हर्जन देण्यात आलंय. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे. याशिवाय क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा-वाइड सेंसर, मॅक्रो लेंससोबत 5 मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे. रेडमी नोट 9 प्रो मॅक्सप्रमाणे या फोनमध्येही NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे.

किंमत : रेडमी नोट 9 प्रो (4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.