फेब्रुवारी महिन्यात भारतीय बाजारात नवीन बीएस-6 इंजिनमध्ये 2020 ‘FZ 25’ (एफजेड 25) आणि ‘FZS 25’ (एफजेडएस 25) सादर केल्यानंतर अखेर Yamaha ने या दोन्ही बाइक्सच्या किंमतीचा खुलासा केला आहे. 10 हजार रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाइटवर दोन्ही अपडेटेड बाइकच्या बूकिंगलाही सुरूवात झाली आहे.

(छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट ऑप्शन आहे ‘ही’ देशातील सर्वात स्वस्त कार! किंमत फक्त…)

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
jharkhand marathi news, logistic company fraud
झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

इंजिन आणि फीचर्स :-
एप्रिल महिन्यातच या दोन्ही बाइकची विक्री सुरू होणार होती, पण करोना महामारीमुळे ही योजना पुढे ढकलण्यात आली होती. या दोन्ही बाइकमध्ये कंपनीने BS6 249cc एअर-कुल्ड, SOHC, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलिंडर इंजिन दिलं आहे. हे इंजिन फ्युअल-इंजेक्शन टेक्नॉलॉजी असलेलं हे इंजिन 8,000 rpm वर 20.8ps पॉवर आणि 6,000 rpm वर 20.1 Nm टॉर्क निर्माण करतं. दोन्ही बाइकमध्ये ड्युअल-चॅनल एबीएस फीचरही आहे. याशिवाय, LED DRL, क्लास D बाइ-फंक्शनल LED हेडलॅम्प, मल्टी-फंक्शन निगेटिव्ह एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अंडर काउलिंग आणि इंजिन कट-ऑफ स्विचसह साइड स्टँड असे अनेक फीचर्स आहेत.

(भरघोस डिस्काउंटसह स्वस्तात खरेदी करा Maruti च्या कार, कंपनीने आणली शानदार ऑफर)

किंमत :-
FZ 25 बाइक मेटॅलिक ब्लॅक आणि रेसिंग ब्लू कलरमध्ये येते. तर, FZS 25 तीन कलरच्या पर्यायांमध्ये- (पेटिना ग्रीन, व्हाइट-वर्मिलियन आणि डार्क मॅट ब्लू) उपलब्ध आहे. BS6 Yamaha FZ 25 ची एक्स-शोरुम किंमत 1.52 लाख रुपये आहे. ही किंमत बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत जवळपास 15 हजार रुपये जास्त आहे. तर, BS6 Yamaha FZS 25 ची एक्स-शोरुम किंमत 1.57 लाख रुपये आहे. ही किंमत बीएस-4 मॉडेलपेक्षा जवळपास 5 हजार रुपये जास्त आहे.

( 5 ऑगस्टला येतेय मारुतीची बहुप्रतिक्षित SUV ! लाँचिंगआधीच 11 हजारांत बूकिंगला झाली सुरूवात)