26 November 2020

News Flash

गरोदरपणात महिलांनी कुठली योगासने करावीत?

योग केल्यामुळे मानसिक आरोग्य जपलं जातं

गरोदर स्त्री ही दोन जीवांची माता असते. त्यामुळे गरोदरपणात स्त्रियांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात स्वत:च्या आरोग्यासोबत बाळाच्या वाढीकडे आणि त्याच्या आरोग्याकडे स्त्रीला विशेष लक्ष द्यायचं असतं. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच स्त्रीचं मानसिक आरोग्यही जपणं तितकंच गरजेचं आहे. योग केल्यामुळे मानसिक आरोग्य जपलं जातं. दिवसभर प्रसन्न आणि आनंदी वाटतं. त्यामुळे गरोदरपणाच्या काळात स्त्रियांनी योग करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे गरोदर स्त्रियांसाठी काही खास आणि सहजसोपी योगासनेदेखील आहेत.

दरम्यान, गरोदर स्थितीत कोणतेही आसन करताना त्याचा शरीरावर अकारण ताण पडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही आसन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा योग्याभ्यासकांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 11:46 am

Web Title: yoga asanas for pregnant womens ssj 93
Next Stories
1 Video : शांत झोप लागण्यासाठी करा ‘ही’ योगासने
2 जीममध्ये जायला वेळ नाही? मग घरीच करा ‘ही’ सहजसोपी योगासने
3 सूर्य ग्रहण पाहाताना हे करून पाहाच
Just Now!
X