5 Amazing Reasons To Drink Pumpkin Seed: प्रत्येक भाजीत भरपूर पोषणमूल्यं असतात. त्यामुळे भाज्यांचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. काही भाज्यांची सालं आणि बियादेखील आरोग्यासाठी उत्तम असतात. भोपळा हा त्यापैकीच एक होय. भोपळ्याची भाजी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असते. तसेच भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी चांगल्या असतात. या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. अलीकडच्या काळात भोपळ्याच्या बियांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण, या बिया इतक्या लोकप्रिय का आहेत? कारण भोपळ्याच्या बिया आवश्यक जीवनसत्त्वे व पोषक घटकानी समृद्ध असतात आणि त्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी एक सुपरफूड ठरतात. त्यामुळे या बियांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पोषणतज्ज्ञ लोकेंद्र तोमर यांच्या मते, “भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, निरोगी चरबी, फायबर आणि मॅग्नेशियम व जस्त यांसारखी खनिजे असतात. त्याशिवाय या बिया अँटीऑक्सिडंट्सनेही समृद्ध असतात.” तुम्ही तुमच्या दैनंदिन जेवणात या बियांचा समावेश नक्कीच करू शकता. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, त्यांचे पाणी पिणेही तितकेच फायदेशीर आहे? रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्यास, ते तुमच्या एकूण आरोग्यासाठी आश्चर्यकारक काम करू शकते.

भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी चांगल्या का?

भोपळ्याच्या बियांचे पाणी पिण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे :

१. रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते – जर तुम्हालाही तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल, तर सकाळी एक ग्लास भोपळ्याच्या बियांचे पाणी पिणे तुम्हाला साह्यकारी ठरू शकते. बियांमधील अँटीऑक्सिडंट्सची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. एकदा तुम्ही त्यांचे पाणी नियमितपणे पिण्यास सुरुवात केली की, तुम्हाला लक्षात येईल की, तुम्ही पूर्वीइतके आजारी पडत नाही आहात.

२. हृदयाचे आरोग्य सुधारते – होय, भोपळ्याच्या बियांचे पाणी प्यायल्याने हृदयाचे आरोग्यदेखील चांगले राहते. राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH)ने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब कमी होतो हे दिसून आले आहे. परिणामी, तुमचे हृदयाचे आरोग्य नैसर्गिकरीत्या सुधारते आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आजारांना प्रतिबंधित करते.

३. चांगली झोप वाढवते – आपल्या सर्वांना शांत झोप हवी आहे, नाही का? पण जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल, तर आतापासून एक ग्लास भोपळ्याच्या बियांचे पाणी प्यायला सुरुवात करा. NIH ने केलेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन भरपूर प्रमाणात असते, जे चांगली झोप वाढवते. तुम्हाला तात्काळ परिणाम जाणवत नसले तरी, ते नियमितपणे पिल्याने कालांतराने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.

४. पचनास मदत करते – भोपळ्याच्या बियांचे पाणी पिण्याचा आणखी एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे ते पचनास मदत करते. पोषणतज्ज्ञ तोमर स्पष्ट करतात की, भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे त्यांचे पाणी पचनासाठी उत्कृष्ट स्रोत ठरते. सकाळी या बियांचे पाणी प्यायल्याने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला गती देऊ शकते.

५. पोषक घटकांच्या शोषणास मदत करते – भोपळ्याच्या बियांचे पाणी पिण्यामुळे शरीरात पोषक घटकांचे शोषणदेखील वाढू शकते. जर्नल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, भोपळ्याच्या बियांमधील अँटीऑक्सिडंट्स, पोषक घटक, आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजांची जैवउपलब्धता यांमुळे तुमचे आरोग्य सुधारण्याला चालना मिळू शकते. मग त्याद्वारे भोपळ्याच्या बियांचे पाणी नियमित सेवन केल्याने तुमचे शरीर आवश्यक पोषक घटक शोषून घेते याची खात्री होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तुम्हाला भोपळ्याच्या बियांचे पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे माहीत झाले आहेत. तेव्हा तुमच्या दैनंदिन आहारात भोपळ्याच्या बिया समाविष्ट करा आणि त्या तुमच्या आरोग्यात कसा आरोग्यदायी बदल घडवून आणतात ते पाहा.