आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी, नेहमी सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकच जण काही ना काही प्रयत्न करत असतो. त्यासाठीच्या खास टिप्स, उपाय आपण सतत वाचत असतो. त्यातले बरेचसे उपाय करूनही पाहत असतो. डोळ्यांखालची काळी वर्तुळं, कोरडी त्वचा, पिंपल्स, सतत गळणारे केस, कोंडा, त्वचेचं टॅनिंग आणि असं आणखी बरंच काही ज्यासाठी अनेक टिप्स लिहिल्या जातात, सांगितल्या जातात. त्यामुळे, आजही आपण अशा ५ अत्यंत प्रभावी टिप्स पाहणार आहोत. मात्र, ह्यासाठी लागणारं साहित्य पाहून निश्चितच तुमच्या भुवया उंचावतील. तर पाहुया, काही अजब साहित्यांचा समावेश असलेल्या या पॉवरफूल ब्युटी टिप्स!

1. Clogged Pores

  • एका बाऊलमध्ये अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोलच्या ५ ते ६ टॅब्लेट्स घ्या. त्यात २ चमचे जिलेटीन आणि ३ चमचे गरम पाणी घालून मिश्रम व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • एका ब्रशने हे मिश्रण त्वचेच्या संबंधित भागावर लावून घ्या. अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने तुमचं पिल-ऑफ मास्क तयार झाला.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

 

2. टाचांच्या भेगा

  • Aspirin ची मोठी टॅबलेट घ्या. रोलिंग पिनच्या मदतीने क्रश करून तिची पावडर करा.
  • ती पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात १ चमचा सायट्रिक अ‍ॅसिड आणि १ चमचा गरम पाणी टाका.
  • हे मिश्रण एका प्लास्टिकच्या पिशवीत भरा आणि त्याच पिशवीत तुमचा पाय ठेवा. त्यानंतर ते सॉक्सने झाकून घ्या. १५ मिनिटं पाय तसाच ठेवा.
  • साधारणतः ५ ते ७ दिवस दररोज हा उपाय केल्यानंतर तुमची डेड स्किन क्लीअर होत आहे हे तुमच्या लक्षात येईल.
  • अलगद हाताने ती तुमची डेड स्कीन काढून टाका. तुम्हाला तुमच्या टाचा पुन्हा छान मऊ झाल्याचा अनुभव येईल.

3. पिंपल्स

  • एक लसूण घ्या. तिचे मधोमध २ तुकडे करा.
  • हे तुकडे पिंपल्स असलेल्या भागावर लावा. ५ मिनिटं तसंच ठेवा.
  • तुम्हाला काहीच वेळात पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला सुरुवात होईल.

4. केसांतील कोंडा

  • एक कांदा किसून घ्या. पुढे एक बारीक चाळणी आणि चमच्याचा वापर करून त्या कांद्याचा रस काढून घ्या.
  • कांद्याच्या रसात १ चमचा नारळाचे तेल आणि १ चमचा बर्डोकचे तेल (Burdock हे एक काटेरी फुल आहे) मिसळा.
  • हे संपूर्ण मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि केसांच्या मूळांवर व्यवस्थित लावा.
  • ३० मिनिटांसाठी तसेच ठेवल्यानंतर एखादा माईल्ड शॅम्पो वापरून केस स्वच्छ धुवून घ्या.

5. केस गळणे

  • २ चमचे गरम पाण्यात १ चमचा बेकर्स यीस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • याच मिश्रणात १ चमचा मध, १ चमचा तुम्हाला आवडणारं कोणतंही तेल, १ चमचा वोडका आणि १ चमचा अंड्याचा पिवळा बलक अ‍ॅड करा.
  • हे साहित्य पुन्हा व्यवस्थित मिक्स करा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.
  • हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांना लावून घ्या आणि कंगव्याच्या मदतीने केसांना देखील लावून घ्या.
  • पुढचे १ ते २ तास केस तसेच ठेवा. त्यानंतर माईल्ड शॅम्पोने केस धुवून घ्या आणि कंडिशनरचा देखील वापर करा.