scorecardresearch

रिकामी पोटी वर्कआउट करू नका, जिमला जाण्यापूर्वी खा ‘हे’ ५ पदार्थ, मिळेल झटपट एनर्जी

अनेकजण जिमला उपाशी पोटी जातात. पण असे न करा एनर्जीसाठी काहीतरी खाऊन जायला हवे.

5 best pre workout foods before you hit the gym
प्रतिकात्मक (Photo : Pexels)

आजकाल बरेच जण वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी वर्कआउटवर लक्ष देतात. घराच्या घरी किंवा जिमला जाऊन वर्कआउट करतात. पण जिममध्ये वर्कआउटसाठी खूप जड उपकरणे असतात. वर्कआउट करताना ही उपकरणे उचलण्यासाठी खूप एनर्जी लागते. पण बरेच जण जिमला जाण्यापूर्वी खाण्याकडे लक्ष देत नाही, किंवा अर्धपोट जिमला जातात. पण असे न करता प्री – वर्कआउट फूडकडे लक्ष दिले पाहिजे. पण वर्कआऊटपूर्वी काय खावं असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे असे ५ प्री वर्कआउट फूड जाणून घेऊ जे तुम्ही जिमला जाण्यापूर्वी खाऊ शकता.

ओटमील

ओटमीलमध्ये शरीरास आवश्यक कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. यातील कार्बोहायड्रेट्समुळे आपल्या शरीरास एक एनर्जी प्रदान करते. यामुळे न थकता वर्कआउट करता येतो.

उकडलेले चिकन

जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये चिकनही खाऊ शकता, यातील प्रथिने शरीराच्या एनर्जीसाठी फायदेशीर ठरतात. यातील लीन प्रोटीन स्नायूंना मजबूत करतात. यामुळे थोडी मिरपूड, मीठ आणि त्यात चिकन टाकून उकडवून ते जिमला जाण्यापूर्वी खाऊ शकता.

स्मूदी

स्मूदीज बनवणे थोडे अवघड आणि वेळ खाऊ असते. पण यात शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. यातील बेरी स्मूदी, ग्रीन स्मूदी तुम्हाला हेवी वर्कआउट करण्यासाठी पुरेशी एनर्जी देतील. बेरी स्मूदीजमध्ये ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी इत्यादींचा समावेश करु शकता. पण हिरव्या स्मूदीमध्ये पालेभाज्या, एवोकॅडो, फळे इत्यादींचा समावेश असतो.

केळी

जिमला जाण्यापूर्वी केळी हे सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ आहे. हे फळ कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियममध्ये समृद्ध आहे. यातील कार्बोहायड्रेट्स शरीराला आवश्यक उर्जा देतात तर पोटॅशियम स्नायूमध्ये येणारे पेटके कमी करण्यास मदत करतात.

एनर्जी बार

अनेकदा घरात वरील पदार्थांपैकी काहीच नसते तेव्हा तुम्ही केमिस्ट दुकान आणि सुपरमार्केटमध्ये सहज उपलब्ध एनर्जी बार खरेदी करुन खाऊ शकता. एका एनर्जी बारमध्ये कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरास आवश्यक एनर्जी यातून मिळते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 10:37 IST
ताज्या बातम्या