जगभरात कॅन्सर हा मृत्यूचं दुसरं मोठं कारण मानलं जातं. भारतात सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सर प्रकारांमध्ये फुफ्फुसाचा, तोंडाचा, पोटाचा, स्तनाचा, गर्भाशयाच्या मुखाचा आणि कोलन (आंत्र) कॅन्सरचा समावेश होतो. ऑक्टोबर महिना Breast Cancer Awareness Month म्हणजेच “स्तन कॅन्सर जागरूकता महिना” म्हणून साजरा केला जातो. या उपक्रमाचा उद्देश महिलांना ब्रेस्ट हेल्थविषयी जागरूक करणे आणि सुरुवातीच्या लक्षणांची ओळख पटवून तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्यास प्रवृत्त करणे हा आहे.

अनेकदा शरीर काही छोटे संकेत देतं — पण आपण त्यांना दुर्लक्ष करतो. हेच संकेत नंतर मोठ्या आजाराचं कारण ठरू शकतात. एनेस्थिसियोलॉजिस्ट आणि पेन मेडिसिन स्पेशॅलिस्ट डॉ. कुनाल सूद यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अशा पाच लक्षणांचा उल्लेख केला आहे, जे स्तनांच्या आरोग्याशी संबंधित समस्या किंवा कॅन्सरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.

१. स्तनात कठीण गाठ (Hard Lump in Breast)

डॉ. सूद यांच्या मते, स्तनात अचानक नवीन आणि कठीण गाठ तयार होणं हे ब्रेस्ट कॅन्सरचं सर्वात सामान्य आणि स्पष्ट लक्षण असू शकतं.
जर स्तनाग्र (निप्पल) आत ओढला जाऊ लागला किंवा त्वचेवर छोटे खड्डे दिसू लागले, तर हे invasive किंवा inflammatory breast cancer चे संकेत असू शकतात. अशा वेळी तीन पातळ्यांवरील तपासणी आवश्यक असते — क्लिनिकल एक्झामिनेशन, इमेजिंग (मॅमोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड) आणि बायोप्सी.

२. स्तनाग्रांमधून स्राव होणे (Nipple Discharge)

जर स्तनपान न करता सुद्धा निप्पलमधून दुधासारखा स्राव होत असेल, तर तो हार्मोनल असंतुलन, हायपरप्रोलॅक्टिनेमिया, थायरॉईड किंवा औषधांच्या परिणामामुळे असू शकतो. पण जर स्तनाग्रांमधून रक्तासारखा स्राव येत असेल, आणि तो फक्त एका स्तनाच्या एका डक्टमधूनच होत असेल, तर ही गंभीर बाब असू शकते. हे Intraductal Papilloma किंवा Duct Ectasia चे लक्षण असू शकतं — आणि सुमारे ११–१६% प्रकरणांत ते कॅन्सरकडेही इशारा करतं.

३. स्तनांचा लालसरपणा, सूज आणि वेदना (Redness, Swelling & Pain)

स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये लालसर, सूजलेले आणि दुखणारे स्तन हे बहुतेकदा Mastitis किंवा Abscess मुळे होतात.
अशा वेळी अल्ट्रासाऊंडद्वारे आतमध्ये पू (pus) किंवा संसर्ग आहे का हे तपासलं जातं. अँटीबायोटिक उपचार आणि नियमित स्तन रिकामं करणं महत्त्वाचं असतं. परंतु उपचारानंतरही जर लालसरपणा आणि सूज कमी झाली नाही, तर तो Inflammatory Breast Cancer चा संकेत असू शकतो.

४. मऊ, हलणारी गाठ (Soft or Movable Lump)

कधी कधी स्तनात जाणवणारी गाठ Fibroadenoma असते, जी एक non-cancerous ट्यूमर आहे. ती सामान्यतः तरुण महिलांमध्ये आढळते. अल्ट्रासाऊंडमध्ये ती अंडाकृती आणि गुळगुळीत किनाऱ्यांसह दिसते. काही प्रकरणांत त्यात popcorn-like calcification दिसते.
स्तनाच्या ऊतींमध्ये (breast tissue) कॅल्शियमचे साचलेले ठिपके (calcium deposits) जे एक्स-रे किंवा मॅमोग्राफीमध्ये दिसतात.
हे ठिपके कधी मोठे, गोलसर आणि पॉपकॉर्न फुटल्यासारखे दिसतात — म्हणून त्यांना “पॉपकॉर्नसारखी कॅल्सिफिकेशन” असं म्हटलं जातं.
जरी यामुळे कॅन्सरचा धोका फारच कमी असतो, तरीही प्रत्येक नवीन गाठीची इमेजिंग व गरज असल्यास बायोप्सी करणे आवश्यक आहे.

५. काखेत सूजलेल्या गाठी (Lumps in Armpit)

काखेत मऊ आणि हलणाऱ्या गाठी सामान्यतः संसर्ग किंवा अलीकडील लसीकरणामुळे होतात. पण जर या गाठी कठीण, स्थिर किंवा वाढत जात असतील, तर त्या Breast Cancer, Melanoma किंवा Lymphoma च्या पसरलेल्या पेशींचे संकेत असू शकतात. डॉ. सूद यांच्या मते, अशा प्रकरणात प्रथम अल्ट्रासाऊंड केला जातो आणि जर परिणाम संशयास्पद असतील, तर बायोप्सी करून पुष्टी केली जाते.

महत्त्वाची सूचना:

ब्रेस्टमधील कोणताही बदल — गाठ, त्वचेचा रंग, स्तनाग्रांचा आकार किंवा स्राव — हलक्यात घेऊ नका. लवकर निदान केल्यास ब्रेस्ट कॅन्सरचं यशस्वी उपचार दर ९०% पेक्षा अधिक आहे. दर वर्षी किमान एकदा ब्रेस्ट सेल्फ-एक्झामिनेशन आणि डॉक्टरकडून तपासणी जरूर करा.