Air Pollution In Diwali in Marathi : दिवसेंदविवस वाढत असलेल्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खराब होत आहे. नुकतेच मुंबई आणि परिसरातील हवा अत्यंत वाईट असल्याचे समोर आले आहे. देशातील प्रदूषित शहर अशीच ख्याती असलेल्या दिल्लीपेक्षाही मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याचे माहिती समोर आले आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबईची गणना झाली आहे. दरम्यान आता दिवाळी काही दिवसांवर आली त्यामुळे
सणासुदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होण्याची चिंता वाढली आहे. कारण या काळात भरपूर प्रमाणात फटाक्यांचा वापर केला जातो. हा फटाक्यांमधून सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनाक्साईड सारखे अनेक धोकादायक घटक हवेत सोडले जातात. हे घटक हवेत मिसळल्यानंतर मानवी आरोग्य आणि वातावरणावर विपरित परिणाम करतात. येत्या सणासुदीच्या काळात वायू प्रदुषापासून स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता.
दिवाळीसारख्या सणांमध्ये वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी उपाययोजना केल्या जाऊ शकतात:
१. घरातच राहा
शक्यतो गरज नसेल तर बाहेर जाणे टाळा. शक्य तितिके घरी राहण्यासाचा प्रयत्न करा विशेषत: जेव्हा वायू प्रदुषण मोठ्या प्रमाणात होते तेव्हा. जर तुम्हा श्वसनसंबधीत आजार असतील तर तुम्ही जास्त काळजी घ्या.
२. घराचे दार -खिडकी बंद ठेवा
जेव्हा फटक्यांमुळे खूप वायू प्रदुषण होत असते तेव्हा दार खिडक्या बंद ठेवा जेणेकरून प्रदुषित हवा घरात शिरते.
हेही वाचा – World Sandwich Day 2023 : जुगारू व्यक्तीच्या जुगाडमुळे लागला सँडविच शोध? पहिले सँडविच कोणी तयार केले?
३. बाहेर जाऊन व्यायाम करणे टाळा
जेव्हा वायू प्रदुषण असते तेव्हा बाहेर जाऊन जॉगिंग करणे किंवा व्यायाम करणे टाळा. तुम्हाला जर व्यायाम करणे आवश्यक असेल तर तुम्ही घरातच करा किंवा जिथे हवा खेळती असते अशा ठिकाणी करा.
४. मास्क वापरा
बाहेर जाताना चांगल्या गुणवत्तेचा मास्क वापरा विशेषत: सणासुदीच्या काळात जेव्हा प्रदुषणाची पातळी वाढते तेव्हा मास्क वापरायला विसरू नका. एन ९५ किंवा एन ९९ हे मास्क अत्यंत प्रभावी आहेत.
५.फटाके कमी प्रमाणात वापरा
फटाके हे सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रदुषणाचे मुख्य कारण असते त्यामुळे त्यांच्या वापर कमी करा किंवा फटाके वापरू नका जेणेकरून फटाके फोडण्यास मदत होईल.
हेही वाचा – प्राणघातक वायुप्रदूषण! ‘या’ आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी घ्या विशेष काळजी; AIIMS चा धक्कादायक अहवाल
६. इको फ्रेंडली फटाके वापरा
जर तुम्हाला फटाके वापरायचे असतील तर कमी आवाजाचे किंवा इको फ्रेंडली फटाके वापरा. हे पर्याय प्रदुषण कमी करतात आणि त्यांचा आवाजही कमी असतो.
७. सार्वजनिक वाहतूकीचा वापरा अथवा एकमेकांना कारने सोडा
एकंदर प्रदुषण कमी करण्यासाठी तुम्ही सार्वजनिक वाहूतकीचा पर्याय वापरू शकता किंवा मित्र-मैत्रिणींसह अथवा कुटुंबासह जेव्हा शक्य असेल तेव्हा एकाच कारने किंवा बाइकने प्रवास करा. ज्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल आणि एकंदर प्रदुषण कमी होईल.
८. जास्तीत जास्त झाडे लावा
झाडे लावण्याच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा किंवा अशा संस्थाना मदत करा ज्या जंगल वाढवण्यासाठी कार्यरत आहे. झाडे हे नैसर्गिकरित्या प्रदुषण कमी करुन हवेची गुणवत्ता सुधारू शकतात.
९. एअर प्युरिफायर वापरा
घरामध्ये एअर प्युरिफायर वापरा जे घरात येणाऱ्या हवेची शुद्धीकरण करता. हे विषाणू घटक नष्ट करण्यासाठी आणि हवा शुद्ध ठेवण्यासाठी मदत करते.
हेही वाचा – वायू प्रदूषणामुळे “ब्रेस्ट कॅन्सर” चा धोका
१० जन जागृती करा.
मित्र-मैत्रिणींना, कुटुंबाना आणि समाजाला प्रदुषणाचे परिणाम आणि ते कसे टाळता येईल याबाबत जागृक करा. जनजागृती केल्यस सर्वांच्या प्रयत्नामुळे हवेतील विषारी घटक कमी होतील. लोकांना माहिती देण्यासाठी उपक्रम आखा. इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करण्यास प्रोत्साहन द्या.
११. सरकारचे उपक्रम
वाहनांच्या बाबतीत सरकारने लागू केलेले नियम काटेकोरोपण पाळा जेणेकरून प्रदुषण कमी होईल आणि इतरांनाही याबाबत जागरुक करा आणि एकूणच प्रदुषण कमी करण्यासाठी सणासुदीच्या काळात अक्षय (कधी न संपणाऱ्या) उर्जा स्त्रोतांचा वापर करा.