Airtel ने आपल्या 65 रुपयांच्या कॉम्बो प्रीपेड रीचार्ज पॅकमध्ये काही बदल केले आहेत. काही निवडक सर्कलमध्ये कंपनीचा हा पॅक आता अधिक टॉक टाइमसह उपलब्ध असेल. 65 रुपयांच्या अपडेटेड प्लाननुसार आता ग्राहकांना 130 रुपयांचा टॉक टाइम मिळेल. याशिवाय इंटरनेट डेटा देखील आहे.

यापूर्वी 65 रुपयांच्या प्लानमध्ये केवळ 65 रुपयांचाच टॉक टाइम कंपनीकडून दिला जायचा. आता, अपडेटेड 65 रुपयांच्या कॉम्बो प्रीपेड रीचार्ज प्लानमध्ये इंटरनेट डेटा देखील वापरायला मिळेल. डेटाची मर्यादा 200 एमबी आहे. या प्लानमध्ये लोकल आणि एसटीडी कॉल शूल्क 60 पैसे प्रतिमिनिट असेल. तसंच 28 दिवसांची वैधता या प्लॅनची आहे. टेलीकॉम टॉकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा : ‘जिओ’प्रमाणे आता व्होडाफोन, एअरटेलनेही ‘ट्रिंग ट्रिंग’च्या वेळेत केला बदल !

जम्मू-काश्मीर, आसाम आणि हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश-उत्तराखंड, पश्चिम बंगालसह अन्य काही सर्कलमध्ये 130 रुपये टॉक टाइम असलेला हा पॅक उपलब्ध झाला आहे. मात्र, मुंबई सर्कलमध्ये याची सुरूवात अद्याप झालेली नाही.