Remedies to clean stomach: आयुर्वेदात मजबूत आणि निरोगी पचनसंस्था राखण्यासाठी अनेक प्रभावी उपाय आहेत. आयुर्वेदिक चिकित्सकांनी अशा औषधी वनस्पती आणि नैसर्गिक उपाय शोधले आहेत, जे केवळ बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या सामान्य समस्याच कमी करीत नाहीत, तर हे पचन सुधारते. अपचनासारख्या पोटाच्या गंभीर आजारांना प्रतिबंधित करते. या उपायांमध्ये एरंडेल तेलाचा समावेश आहे. हे तेल अविश्वसनीयपणे प्रभावी आहे.

या तेलाचा वापर केल्याने स्तनातील वेदना आणि सूज नियंत्रित होण्यास मदत होते. या तेलाने स्तनातील गाठींवर मालिश करणे फायदेशीर आहे. या तेलाने काविळीवरदेखील उपचार करता येतो. आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य बाळकृष्ण स्पष्ट करतात की, एरंडेल तेल कोमट पाणी किंवा दुधासोबत सेवन केल्याने यकृताचे आरोग्य सुधारते. हे तेल पाचक अमृत मानले जाते. ज्या लोकांना दररोज पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवते, त्यांनी दोन चमचे एरंडेल तेलात थोडासा लिंबाचा रस मिसळून प्यावे, जेणेकरून त्यांच्या पोटदुखीवर उपचार होतील. हे तेल दीर्घकालीन वेदनादेखील नियंत्रित करते. कोलायटिस, अमीबियासिस किंवा दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी हा एक उत्तम उपाय आहे. एरंडेल तेलाचा पोटावर कसा उपाय होतो ते जाणून घेऊया.

एरंडेल तेलापासून पोटदुखीवर उपाय कसा बनवला जातो

पोटदुखी, बद्धकोष्ठता व गॅससाठी एरंडेल तेल अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदात पचन सुधारण्यासाठी आणि आतडे स्वच्छ करण्यासाठी ते महत्त्वाचे मानले जाते. नियमित व योग्य प्रमाणात त्याचे सेवन केल्याने पोट हलके राहण्यास आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठतेसाठी एरंडेल तेल हे एक सुरक्षित आणि प्रभावी नैसर्गिक उपाय आहे. ते योग्य प्रमाण आणि पद्धतीने वापरल्यास ते शरीर हलके आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लासभर दुधात दोन चमचे एरंडेल तेल मिसळून घेतल्याने पचनक्रिया चांगली राहते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी एरंडेल तेल वापरायचे असेल, तर एक ग्लास दुधात २०-२५ मनुके शिजवा आणि त्यात दोन चमचे एरंडेल तेल घाला. झोपण्यापूर्वी ते प्या. जर तुम्ही रात्री हे दूध प्यायलात, तर सकाळी सर्वांत आधी तुमचे पोट स्वच्छ होईल. अशा रीतीने तुमच्या आतड्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला मल बाहेर पडेल. हे तेल तुमच्या आतड्यांना बळकटी देईल आणि आतड्यांतील जळजळ नियंत्रित करेल. हे तेल प्यायल्याने आतड्यांमध्ये पाचक एंझाइम्सचे उत्पादन सुरू होईल आणि तुमचे अन्न लवकर पचेल. या तेलाचे सेवन केल्याने कोलायटिससारख्या समस्यांपासूनदेखील आराम मिळू शकतो. पोट साफ करण्यासाठी हे तेल एक उत्तम उपाय आहे.