Amazon ने घोषित केलं ‘धनतेरस स्टोअर’; डिजिटल गोल्डवर कॅशबॅकची केली घोषणा

धनतेरसचा शुभ प्रसंग साजरा करण्यासाठी, amazon pay वर ग्राहकांना २० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर पर्यंत डिजीटल गोल्डवर कॅशबॅकची ऑफर देईल.

Amazon-1-3
धनतेरस स्टोअर ( फोटो: इंडियन एक्स्प्रेस)

अॅमेझॉन ‘धनतेरस स्टोअर’मध्ये ग्राहक मालबार गोल्ड अँड डायमंड, कल्याण ज्वेलर्स कडून कँडेर, हरशीज फॅशन ड्रीम, बिबा, मान्यवर, मेबेलाईन, सोनी, वन प्लस, प्रेस्टीज, फेरेरो रोचर, हॅप्पिलो यांसारख्या अग्रेसर ब्रॅण्ड्समधून निवड करू शकतात. ब्रॅण्ड्स व्यतिरीक्त, ‘धनतेरस स्टोअर’ हजारो उदयोन्मुख लघु आणि मध्यम व्यवसायांमधून मोठ्या निवडीची ऑफर देईल जी उत्तम मूल्य आणि सोयीस्करपणाची असेल. उत्सवांसाठी घरासाठी सजावटीच्या वस्तूंपासून ते मोहक इथनिक वेयरपर्यंत ग्राहक भारतभरातील लघु आणि मध्यम व्यवसायांमधील विक्रेत्यांकडून वस्तू घेऊ शकतात.

याव्यतिरीक्त, धनतेरसचा शुभ प्रसंग साजरा करण्यासाठी, अॅमेझॉन पे त्याच्या ग्राहकांना २० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर पर्यंत डिजीटल गोल्डवर कॅशबॅक ची ऑफर देईल. सर्व प्राईम सदस्य ५% कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात, तर प्राईम नसलेले सदस्य त्यांच्या अॅमेझॉनवरील डिजीटल गोल्ड खरेदीवर ३% कॅशबॅक मिळवू शकतात. या उत्सव कालावधीतील आदर्श भेट म्हणून, ग्राहक त्यांच्या प्रियजनांना तात्काळ गोल्ड व्हाऊचर सुद्धा पाठवू शकतात आणि अलुक्काज, जॉय अलुक्काज, PCJ, कल्याण ज्वेलर्स यांसारख्या आवडत्या ब्रॅण्ड्सवर ५% सूट मिळवू शकतात. ते त्यांच्या घरीच आरामात बसून २००० किंवा त्यापेक्षा जास्त रूपयांचे गिफ्ट कार्ड्स पाठवू शकतात आणि त्यावर २०० रूपये परत सुद्धा मिळवू शकतात.

( हे ही वाचा: MHT CET Result 2021: निकालाची ‘ही’ आहे अपेक्षित तारीख; जाणून घ्या अधिक तपशील )

नवीनतम स्मार्टफोन्सवर उत्तम ऑफर

Redmi Note 10 Pro Max – इमर्सिव्ह ऑडिओ अनुभवासाठी ड्युअल स्टिरीओ स्पीकर्स, डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास ५, ३.५ मिमी जॅक, IR ब्लास्टर, समर्पित मायक्रो एसडी स्लॉट, Z-अॅक्सिस लिनियर व्हायब्रेशन मोटर, IP 52 प्रमाणित, फ्लॅगशिप १०८ MP द्वारे संरक्षित आहे. मुख्य कॅमेरा ८ MP अल्ट्रावाइड-FOV ११८ अंश ५MP मॅक्रो सेन्सर २MP डेप्थ सेन्सर स्लो मोशन सपोर्ट. तुम्ही हे १८,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात.

( हे ही वाचा: Gold: सर्वात स्वस्त सोनं ‘इथे’ उपलब्ध; १० ग्रॅमवर बंपर सवलत! )

Redmi 9A – AI पोर्ट्रेट, AI सीन रेकग्निशन, १६.५८ सेंटीमीटर (६.५३ इंच) HD+ मल्टी-टच कॅपेसिटिव्ह टचस्क्रीन १६०० x ७२० पिक्सेल रिझोल्यूशन, २६८ ppi पिक्सेल डेसीटी आणि २०:९ रेशोसह १३ MP रिअर कॅमेरासह येतो. हा स्मार्टफोन ६,७९९ रुपयांना खरेदी करता येईल.

( हे ही वाचा: वडिलांच्या मृतदेहासमोरच तरुणीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; युजर्सनी फटकारलं )

OnePlus Nord 2 5G (ब्लू हेझ, ८GB RAM, १२८GB स्टोरेज) – स्लीक डिझाइन, जबरदस्त कॅमेरा आणि जबरदस्त फास्ट चार्जिंगसह हा स्मार्टफोन मिळवा. यात ६..४३-इंच, ९०Hz फ्लुइड AMOLED डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा आहे आणि इतर वैशिष्ट्यांसह ड्युअल ५G सिम कार्डला सपोर्ट करतो. हा फोन २९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amazon announces dhanteras store announced cashback on digital gold ttg

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या