अॅमेझॉनने Echo Show 5 नावाचं एक नवं उपकरण लाँच केलं आहे. हे उपकरण म्हणजे एक स्मार्ट डिस्प्ले आहे. हे उपकरण सध्या काही ठराविक देशांमध्येच उपलब्ध होणार असून भारतात जुलै महिन्यात हा स्मार्ट डिस्प्ले विक्रीसाठी उपलब्ध असेल. यापूर्वीच्या ‘इको शो’ या मूळ मॉडेलच्या तुलनेत हा डिस्प्ले आकारमानाने थोडा लहान आहे. 8,999 रुपये इतकी या स्मार्ट डिस्प्लेची किंमत ठेवण्यात आली आहे.

या डिव्हाइसमध्ये 5.5 इंच आकारमानाचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याच्या पुढील बाजूला एचडी कॅमेरा असून याद्वारे युजरला व्हिडीओ कॉलिंग करता येणं शक्य आहे. तसंच, यामध्ये स्काईप कॉलिंगचा सपोर्टदेखील आहे. याशिवाय कॅमेर्‍यामध्ये इनबिल्ट शटर आहे, म्हणजे उपयोग नसताना हे शटर लावले जाते. यात अॅमेझॉन सिल्क आणि मोझिलाच्या फायरफॉक्स या ब्राऊजरवरून इंटरनेटचा वापरही करता येणार आहे. याला अॅमेझॉनच्या अॅलेक्साच्या मदतीने केवळ आज्ञा देऊन यातील विविध फंक्शन्सचा वापर करु शकतात. अर्थात यावरुन अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरून चित्रपट, मुव्ही ट्रेलर्स, दूरचित्रवाणी कार्यक्रम किंवा अॅमेझॉन प्राईम म्युझिकवरून संगीतदेखील ऐकता येणार आहे. याशिवाय, अॅलेक्साचे अन्य सर्व फंक्शन्स यात वापरता येतील. Echo Show 5 मध्ये अॅलेक्सा सनराइज अलार्म हे नवं फीचर देण्यात आलं आहे. याद्वारे अलार्म बंद होण्याआधी डिस्प्लेचा ब्राइटनेस वाढतो आणि सनराइज अॅनिमेशन दिसण्यास सुरूवात होते.