Healthy Lifestyle : पू्र्वीच्या स्त्रिया किती निरोगी होत्या, असं तुम्ही अनेकदा वाचले असेल किंवा ऐकले असेल. त्यांना त्या काळात अंगदुखी, पीसीओडी, पीसीओएस,अनियमित पाळी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागायचा नाही पण हल्ली महिलांमध्ये या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवतात. तुम्हाला माहिती आहे का पूर्वीच्या स्त्रिया एवढ्या निरोगी कशा होत्या? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

योग अभ्यसाक मृणालिनी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूर्वीच्या स्त्रिया एवढ्या निरोगी कशा होत्या? याविषयी सांगितले आहे. त्या सांगतात की पूर्वी महिला त्यांच्या दैनंदिन जीवनात पाच आसनांचा समावेश करायच्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते पाच आसन कोणते? मृणालिनी यांनी या व्हिडीओमध्ये हे पाच आसनाविषयी सांगितले आहे आणि विशेष म्हणजे हे पाचही आसन करून दाखवले आहे.

व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –

१. काष्ठ तक्षणासन

पूर्वी महिला लाकूड तोडायच्या त्यावेळी त्या काष्ठ तक्षणासन या स्थितीत बसायच्या.

२. गत्यात्मक मलासन

पूर्वी महिला गत्यात्मक मलासन स्थितीत केर काढायच्या किंवा फरशी पुसायच्या.

३. चक्कीचालनासन

पूर्वी महिला जात्यावर धान्य दळायच्या तेव्हा धान्य दळताना त्या चक्कीचालनासन करायच्या.

४. रज्जूकर्षासन

पूर्वीच्या महिला विहिरीतून पाणी काढताना रज्जूकर्षासन करायच्या.

५. नौकासंचालनासन

पूर्वी महिला नौका वल्हवायच्या. त्यावेळी त्या नौकासंचालनासन करायच्या.

हेही वाचा : Mirroring : समोरच्याला कॉपी करणे चुकीचे आहे का? हा मानसिक आजार असू शकतो का? वाचा, मानसोपचार तज्ज्ञ काय सांगतात..

पाहा व्हिडीओ

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हीसुद्धा रोज या योगासनांचा सराव करून तुमचे आरोग्य सुधारू शकता. या आसनांच्या नियमित सरावाने तुमची पचनसंस्था, प्रजननसंस्था, हाडांचे व स्नायूंचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

काष्ठ तक्षणासन – २० वेळा
चक्कीचालनासन (सरळ व उलट दिशेने १०-१० वेळा)
गत्यात्मक मलासन – २ ते ३ मिनिटे
रज्जू कर्षासन – २० वेळा
नौका संचालनासन – (सरळ व उलट दिशेने १०-१० वेळा)

प्रत्येक योगासन करताना पूर्ण ताकदनीशी करा.
सुरुवातीला वेळ आणि वारंवारता कमी ठेवून मग सराव होईल तस वाढवत न्या.
वेदना किंवा अस्वस्थ वाटेल ती हालचाल / आसने टाळा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजकाल हे सर्व करायला कमीपणा वाटतो आणि त्यासाठी कामवाली बाई ठेवली जाते, वेळ नसल्याचे कारण दिले जाते.” तर एका युजरने लिहिलेय, “गावाकडे अजून पण ही पद्धत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “खुप छान माहिती दिली”