Google ने आपल्या प्ले-स्टोअरवरुन १७ धोकादायक अ‍ॅप्स हटवले आहेत. जुलै ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतच्या कालावधीत हे १७ अ‍ॅप्स हटवण्यात आले आहेत. गुगलने जुलै महिन्यात ११ धोकादायक अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवर बॅन केले होते, त्यानंतर काही दिवसांपूर्वी अजून ६ अ‍ॅप्स हटवले होते. हटवण्यात आलेले सर्व अ‍ॅप्स ‘मॅलवेअर जोकर’ या व्हायरसने इन्फेक्टेड आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्व १७ धोकादायक अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवरुन हटवले असले तरी जे युजर्स यांचा वापर करत होते त्यांच्या डिव्हाइसमध्ये अ‍ॅप्स अजूनही आहेत. फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे अ‍ॅप्स डिलिट करण्याचं आवाहन युजर्सना करण्यात आलं आहे. यातील ११ अ‍ॅप्स चेक पॉइंटच्या रिसर्चर्सनी जुलै महिन्यात शोधले. तर, नुकतेच हटवण्यात आलेले सहा धोकादायक अ‍ॅप्स सायबर सिक्‍युरिटी फर्म Pradeo च्या अभ्यासकांनी शोधले. २०१७ पासून गुगलने ‘मॅलवेअर जोकर’ने इन्फेक्टेड असलेले १७०० अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत. पण दरवेळेस नव्या रुपात हा व्हायरस प्ले स्टोअरवर येत असतो.

बघुया कोणते आहेत हटवलेले धोकादायक Apps :-

com.imagecompress.android

com.relax.relaxation.androidsms

com.file.recovefiles

com.training.memorygame

Push Message- Texting & SMS

Fingertip GameBox

com.contact.withme.texts

com.cheery.message.sendsms (two different instances)

com.LPlocker.lockapps

Safety AppLock

Emoji Wallpaper

com.hmvoice.friendsms

com.peason.lovinglovemessage

com.remindme.alram

Convenient Scanner 2

Separate Doc Scanner

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Android users advised to remove 17 google play store apps check list sas
First published on: 14-09-2020 at 11:00 IST