Apple or Coffee : आपल्या देशात सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. अनेक जण दिवसभर दोन तीन कप कॉफी आवडीने पितात तर काही लोकांना सफरचंद सुद्धा खायला आवडते. पण सकाळी उठल्यानंतर कॉफी प्यावी की सफरचंद खावे? कॉफी किंवा सफरचंद यापैकी कशाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.

न्युट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सकाळी उठल्यानंतर कॉफीचे सेवन करावे की सफरचंद खावे, याविषयी सविस्तर सांगितले आहे.
न्युट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल व्हिडीओत सांगतात, “तुम्ही कॉफी पिता की सफरचंद खाता? कॉफी पिऊ नका तर त्याऐवजी सफरचंद खा. सफरचंदमध्ये कॅफीन नसते पण यात नॅचरल शुगर असते ज्यामुळे आपण सकाळी लवकर उठतो. नॅचरल शुगर दिवसभर आपल्याला ऊर्जा देते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.”

हेही वाचा : Money Plant : मनी प्लांट कसा लावायचा? जाणून घ्या ही सोपी पद्धत; पाहा VIDEO

nmamiagarwal या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सफरचंद की कॉफी… सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय घ्याल?”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली” तर एका युजरने चांगली माहिती सांगितली म्हणून आभार व्यक्त केले आहेत. अनेक युजर्सनी सांगितले आहे की त्यांना सकाळी सफरचंद खायला आवडते.