सर्वात मजबूत Apple वॉच सिरिज ७ लॉंच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

नव्या आकारामुळे या वॉचमध्ये जास्त टेक्स्ट आणि फुल QWERTY कीबोर्ड सहज वापरता येतो.

lifestyle
अॅपल वॉच सिरिज ७ हा अंदाजे २९,३७९ या किंमतीत लॉंच करण्यात आलेला आहे.

अॅपलच्या ‘कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग’ या सर्वात मोठ्या कार्यक्रमात कंपनीने आयफोन १३ सिरिजसह अॅपल वॉच सीरीज ७ आणि वॉच सीरीज देखील लॉंच केली आहे. अॅपलने या कार्यक्रमाद्वारे सांगितले की, अॅपल वॉच सिरिज ७, तसेच सिरिज ६ या मध्ये जास्त बदल नाही. या वॉच मधील काही फीचर्स सामान्य मानली जाऊ शकतात. दरम्यान अॅपल वॉच सिरिज ७ मध्ये मोठा रेटिना डिस्प्ले देण्यात आला असून यामधला हा सर्वात मोठा बदल त्यांनी यावेळी केला आहे. अॅपल वॉच ७ मध्ये मोठ्या स्क्रीनच्या कीबोर्डला सपोर्ट देण्यात आलाय. ज्याने तुम्ही सहज मेसेजचा रीप्लाय या वॉच मधून देता येणार आहे. विशेषतः या सिरिज ७ मध्ये नवीन वॉचफेस देण्यात आलेला आहे.

अॅपल वॉच सीरीज ७ हा फास्ट चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. तसेच हा वॉच तुम्हाला पाच नवीन अॅल्युमिनियम रंगाच्या ऑप्शनसह विकत घेता येणार आहे. यामध्ये तुम्हाला सिल्व्हर, ग्रेफाइट आणि गोल्ड स्टेनलेस स्टील या रंगामध्ये विकत घेता येणार आहे.

अॅपल वॉच सिरिज ७ ची किंमत

अॅपल वॉच सिरिज ७ हा अंदाजे २९,३७९ या किंमतीत लॉंच करण्यात आलेला आहे. तसेच कंपनीने यात जुन्या दोन वॉच मॉडेलची विक्री सुर ठेवली आहे. यात अॅपल सिरिज ३ ची किंमत आता १४,६५३ रुपये इतकी असून अॅपल वॉच एसई (Apple Watch SE) ची किंमत आता अंदाजे २०,५४३ इतकी या इव्हेंट दरम्यान करण्यात आलेली आहे.

अॅपल वॉच सिरिज ७ चे स्पेसिफिकेशन

नवीन अॅपल वॉच सीरीज ७ फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अॅपल वॉच सिरिज ७ (Apple Watch Series 7) कंपनीची आतापर्यंतची सर्वात मजबूत Apple वॉच आहे, अस यावेळी कंपनीने म्हंटले आहे. तसेच वर्कआउट करताना यातील फॉल डिटेक्शन फीचर देखील खूप उपयुक्त ठरू शकते. अॅपल वॉच सिरिज ७ सीरिज ४१mm आणि ४५mm अशा दोन साईजमध्ये सादर करण्यात आले आहेत.

अॅपल वॉच सीरीज ७ IP6X डस्ट रेजिस्टेंससह सादर करण्यात आले आहे. ही सीरिज १८ तासांचा बॅटरी लाईफ देईल. जुन्या वॉच सीरीजच्या तुलनेत ही सीरिज USB-C च्या मदतीने ३० टक्के जास्त वेगाने चार्जिंग करता येईल. यातील watchOS ८ क्विकपाथसह एका फुल कीबोर्डला सपोर्ट करतो. या वॉचमध्ये ईसीजी आणि ब्लड ऑक्सीजन मॉनिटर सारखे फिचर मिळतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Apple watch series 7 introducing the company strongest watch know the price and specification scsm