How To Prevent Hair Fall: केसगळतीची समस्या अलीकडे खूपच सामान्य आहे. अगदी आपल्याला ज्यांच्या केसाचा हेवा वाटतो त्यांनाही केसगळतीचा त्रास होतोच. अशावेळी शेजारच्या काकू, लांबची आत्या, मैत्रिणी सगळ्यांचं ऐकून आपणही अनेक तेल, शॅम्पू बदलून पाहतो पण यातील केमिकलमुळे केसाची आणखीनच दुर्दशा होते. केस विरळ झालेले पाहून कधी एखादी आजी येऊन “बाय गं रोज केसाला तेल लाव” असा सल्ला देते पण हे खरंच शक्य होत नाही, हे आम्हीही जाणतो. ऑफिस, कॉलेज, शाळेतच नव्हे तर अगदी नाक्यावरच्या दुकानात जातानापण तेलकट चिकट केस घेऊन जाणं अनेकांना संकोच वाटू शकतो. मुळात तेल लावल्यावर केसाची अगदी शेपटी होत असल्याने जास्तच नकोसं वाटतं, हो ना?

मैत्रिणींनो, आज आपण तेलासाठी एक बेस्ट पर्याय पाहणार आहोत, अगदी १०- १५ रुपयात तुम्ही हा सोप्पा उपाय करू शकणार आहात. बरं यात शून्य केमिकल असल्याने तुम्हाला कोणताच साईड इफेक्ट होण्याची शक्यता नगण्य आहे. चला तर फार वेळ न घालवता पाहुयात कसा बनवायचा मॅजिक बटवा?

  • सर्वप्रथम एक मऊ स्वच्छ रुमाल घ्या.
  • रुमालात थोडे मेथीचे दाणे घ्या
  • यात चार ते पाच लवंग घ्या
  • हा बटवा एखाद्या साध्या रबरने बांधून घ्या
  • गरम तव्यावर ही पोटली थोडी शेकून मग केसाच्या मुळाला अलगद हातांनी शेक द्या.

तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असायला हवे? Perfect बॉडी साठी पाहा सोप्पा तक्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, मेथीमुळे केसाची मुळं मजबूत होण्यात मदत होते, जर तुम्हाला शक्य असेल तर आठवड्यातून एकदा मेथी दाणे भिजवून त्याची बारीक पेस्ट करून केसाच्या मुळांना लावून ठेवू शकता. यामुळे रुक्ष केस मऊ होण्यासही मदत होते.