युरिक ऍसिड हे शरीरात तयार होणारे रसायन आहे प्युरिन जास्त असलेल्या पदार्थांमुळे वाढते. युरिक अॅसिड वाढणे ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे आजार त्रास देऊ लागतात. शरीरात यूरिक ऍसिडची उच्च पातळी हायपरयुरिसेमिया नावाची समस्या निर्माण करते ज्यामुळे संधिरोग होतो. संधिरोग म्हणजे सांधेदुखी आणि सूज या प्रकारच्या समस्या दिसतात. सांधेदुखीमुळे होणाऱ्या वेदना आणि सूजमुळे उठणे आणि बसणे देखील कठीण होते. ज्या लोकांमध्ये यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसंच जीवनशैलीत बदल करणे देखील गरजेचे आहे. याचप्रमाणे तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकता, ज्यामुळे वेदनापासून आराम मिळू शकतो.

युरिक ऍसिड हे असे टॉक्सिन आहे की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय खूप प्रभावी ठरतात. योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, आयुर्वेदिक डिकोक्शन आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती यूरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. युरिक ऍसिडचे वाढलेले प्रमाण कसे नियंत्रित करावे ते जाणून घेऊया.

( हे ही वाचा: Garlic Benefits: रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे ठरेल वरदान; तज्ञांच्या मते याचे सेवन केल्यास ‘हे’ आजार कधीही होणार नाहीत)

आयुर्वेदिक पुनर्नवा काढा युरिक ऍसिड कमी करते

ज्या लोकांचे यूरिक अॅसिड जास्त राहते त्यांनी बाबा रामदेव यांचा आयुर्वेदिक पुनर्नावा काढा घ्यावा. पुनर्नवा ही अशी एक औषधी वनस्पती आहे जी सांधेदुखी आणि सूज दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. या काढ्याचे सेवन केल्याने शरीरातील युरिक ऍसिड लघवीद्वारे बाहेर फेकले जाते. याचे सेवन केल्याने सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो.

गुग्गुलने करा यूरिक ऍसिड नियंत्रित

गुग्गुलचे सेवन युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या या औषधी वनस्पतीसह अनेक रोगांवर उपचार केले जातात. हे सांध्यातील वेदना आणि सूज दूर करते.

( हे ही वाचा: पाठीच्या ‘या’ भागात दुखणे ठरू शकते हृदयविकाराच्या झटक्याचे कारण; जाणून घ्या तज्ञांनी दिलेली महत्वाची माहिती)

सुंठ यूरिक ऍसिड नियंत्रित ठेवते

सुंठ हा असाच एक मसाला आहे ज्याचे सेवन यूरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी केले जाऊ शकते. यामुळे सांध्यातील वेदना आणि सूज कमी होते. सुंठ बारीक करून त्याची पावडर बनवून वापरता येते. सुंठामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, सोडियम, जीवनसत्त्वे ए आणि सी, झिंक, फोलेट अॅसिड, फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

हळदीचे सेवन करा

औषधी गुणधर्मांनी युक्त हळदीचे सेवन केल्याने युरिक अॅसिड नियंत्रणात राहते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन जळजळ दूर करते. यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म देखील आहेत जे यूरिक ऍसिड कमी करतात आणि शरीर निरोगी ठेवतात.