Bajaj Auto ने आपली लोकप्रिय बाइक Platina 110 H-Gear ही नव्या बीएस-6 इंजिनसह लाँच केली आहे. विशेष म्हणजे आता ही बाइक केवळ डिस्क व्हेरिअंटमध्येच लॉन्च करण्यात आली आहे. तर, ड्रम ब्रेक व्हेरिअंट कंपनीने बंद केले आहे. आधीच्या बीएस4 मॉडेलच्या तुलनेत नव्या बाइकची किंमतही अधिक आहे.
इंजिन –
अपडेटेड बजाज प्लॅटिना 110 एच-गिअरमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे यात दिलेले बीएस-6 इंजिन. या बाइकमध्ये बीएस-6, 115cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन आहे. 5-स्पीड गिअर बॉक्ससह हे अपडेटेड इंजिन 8.44hp ऊर्जा आणि 9.81Nm टॉर्क निर्माण करते. बीएस-4 व्हर्जनच्या तुलनेत बीएस-6 इंजिनची पावर थोडी कमी आहे. बाइकमध्ये एलईडी डीआरएलसह हॅलोजन हेडलॅम्प, ब्लॅक अॅलॉय व्हील्स आणि गिअर शिफ्ट गाइडसह डिजिटल-अॅनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर हे फीचर्स आहेत. बाइकच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रिअरमध्ये नाइट्रॉक्स-चार्ज्ड ट्विन स्प्रिंग शॉक अब्जॉर्बर्स सस्पेंशन सिस्टिम आहे. ब्रेकिंगसाठी फ्रंटमध्ये 240mm डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये 110mm ड्रम ब्रेक आहे. ब्लॅक आणि रेड कलरमध्ये ही बाइक उपलब्ध आहे. बीएस-6 इंजिनशिवाय प्लॅटिना 110 एच-गिअरमध्ये अन्य काही बदल करण्यात आलेला नाही. गाडीची डिझाइन आणि अन्य फीचर्स आधीप्रमाणेच आहेत.
किंमत –
कंपनीने BS6 Bajaj Platina 110 H-Gear ची एक्स-शोरुम किंमत 59,802 रुपये ठेवली आहे. बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत बीएस-6 प्लॅटिना 110 एच-गिअरची किंमत 3,431 रुपयांनी अधिक आहे. बीएस-4 डिस्क व्हेरिअंटची किंमत 56,371 रुपये होती.