औषधी रेणूमुळे एड्स, हेपॅटिटिस, इन्फ्लुएंझावर मात
केळीमध्ये आढळून आलेल्या एका पदार्थाला औषधांनी संपृक्त केल्यास त्याचा वापर एड्स, हेपॅटिटिस सी व इन्फ्लुएंझा यांसारख्या रोगांच्या विषाणूंना मारण्यासाठी होतो असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. याचा अर्थ केळी खाऊन एड्स व इतर रोग बरे होतात असा नाही.
यात विषाणूंशी लढण्याची पद्धत बदलण्यात आली असून साखरेची संकेतावली आपल्या पेशी संदेशवहनासाठी वापरतात त्याचा उपयोग करण्यात आला आहे. ही संकेतावली विषाणू व इतर आक्रमक विषाणू पळवतात, त्यामुळे आपण रोगांना तोंड देऊ शकत नाहीत. आता नव्या पद्धतीने अनेक औषधे तयार होऊ शकतात. नवीन संशोधनानुसार केळ्यातील लेक्टिन या प्रथिनावर लक्ष केंद्रित केले आहे, त्याला बनलेक म्हणतात. ते पेशी व विषाणूंच्या बाहेरच्या भागावर राहून साखरेची संकेतावली वाचू शकतात. पाच वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी असे दाखवले होते की, एड्सचा विषाणू पेशींमध्ये शिरण्यास हे प्रथिन अटकाव करू शकते व त्यात वाईट परिणाम कमी होतात. मिशीगन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी बनलेक प्रथिनाची नवी आवृत्ती तयार करून ती उंदरांमध्ये वापरली आहे पण त्यात अनावश्यक वेदनांचा त्रास होत नाही. त्यांनी एच ८४ टी हा बनलेक प्रथिनाचा नवा प्रकार शोधून काढला असून त्यात एका जनुकात बदल केला आहे. बनलेक प्रथिनाचा एड्स, हेपॅटिटिस सी व इन्फ्लुएंझा या रोगांमध्ये चांगला उपयोग होतो. बनलेक या प्रथिनात विषाणूविरोधी गुण असतात व ते सध्या तरी उपचारासाठी उपलब्ध नाही असे मिशीगन विद्यापीठाच्या वैद्यक विभागाचे डेव्हिड मार्कोवित्झ यांनी सांगितले. लेक्टिनच्या विषाणूत काही बदल घडवून नंतर तो विषाणूविरोधात वापरला जातो. क्ष किरण व इतर तंत्रांचा वापर करून बनलेक प्रथिनाच्या प्रत्येक अणूचे स्थान शोधण्यात आले व नंतर बदललेल्या स्थितीतही त्याची रचना तपासण्यात आली. बनलेक हे प्रथिन पेशी व विषाणूंना बाहेरून चिकटते व त्यामुळे शरीराच्या प्रतिकारशक्ती प्रणालीस संदेश जातो. बनलेक या प्रथिनाच्या रेणूत काही बदल केल्याने हे घडून येते. नवीन रेणूमुळे या विषाणूंना पेशीत प्रवेश मिळत नाही. बनलेक प्रथिनाच्या नव्या रचनेत त्याच्या पृष्ठभागावर कमी बिंदू असतात त्यांना ग्रीक की साइट्स असे म्हटले जाते. यात प्रतिकारशक्ती यंत्रणेतील टी पेशींना ते अनेक बिंदूंवर चिकटते. बनलेक प्रथिन विषाणूच्या पृष्ठभागावरील साखरेच्या रेणूंना पकडते, त्यामुळे विषाणू पेशीत जाऊ शकत नाहीत. सेल या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2015 रोजी प्रकाशित
विविध विकारांसाठी केळी उपयुक्त
बनलेक प्रथिन विषाणूच्या पृष्ठभागावरील साखरेच्या रेणूंना पकडते, त्यामुळे विषाणू पेशीत जाऊ शकत नाहीत
Written by रत्नाकर पवार

First published on: 29-10-2015 at 01:50 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banana useful for all deices