Why just karela juice is not enough : बदलत्या खाणपिण्याच्या सवयींमुळे आजकाल लोक निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांच्या खाण्याच्या सवयींची खूप काळजी घेतात. पण, जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल, तर तुम्ही त्यानुसार आहार घ्यावा, जसे मधुमेह असलेल्या लोकांनी असे पदार्थ खावेत, जे शरीरातील साखरेची पातळी योग्य ठेवतील. त्याशिवाय त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय अवलंबावेत, ज्यामध्ये कारल्याचा रसदेखील अधिक फायदेशीर आहे. त्यासाठी बहुतेक मधुमेह रुग्ण रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कारल्याचा रस पितात. असाच एक बँक अधिकारी ज्याला वयाच्या ४० व्या वर्षी डायबेटीस झाला आणि यावेळी त्यांनी कारल्याचा रस प्यायला सुरुवात केली आणि २० वर्षांनंतर त्यांच्या किडन्या फेल झाल्या… नक्की काय चुकलं, वाचा..

रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करताना मधुमेहींनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. अशा वेळी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात मधुमेहस्नेही खाद्यपदार्थांनी करणे गरजेचे आहे. असे केल्याने साखर नियंत्रणात राहते. मात्र, आजकाल लोकांचे शेड्युल खूप बिझी असते. त्यामुळे त्यांना आरोग्याची काळजीदेखील घेता येत नाही. पण जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, कारल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते का, असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो. मधुमेही लोकांमध्ये कारले इन्सुलिनसारखे काम करते. परंतु, याचा अर्थ असा होत नाही की, आपण एकीकडे तुम्ही गोड व खारट पदार्थांचे सेवन करणं आणि दुसऱ्या बाजूला कारल्याचं सेवन करणं योग्य ठरेल. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल, तर त्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं योग्य प्रमाणात सेवन करीत असाल, तरच कारल्याचा तुम्हाला फायदा होईल.

जम्मूमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काम करणारे रविंदर सुस यांना वयाच्या चाळिशीत चक्कर येणं, दृष्टी अंधुक होणं आणि वारंवार लघवी होणं, असे त्रास होत होते. तपासणीत रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचं दिसून आलं. परंतु, ते एक खेळाडू असल्यानं आणि त्याच्या कुटुंबाचा कोणताही डायबेटीसचा इतिहास नसल्यानं, त्यांना वाटलं की, ते व्यायाम करून, आहारातील साखर मर्यादित करून आणि कारल्याच्या रसासारखे हर्बल सप्लिमेंट्स पिऊन त्याचं प्रमाण कमी करू शकतो. आणि याचमुळे त्यांनी कोणतीही तपासणी केली नाही. औषधांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, जवळजवळ २० वर्षांनंतर एके दिवशी अचानक त्यांचं तीव्र मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे ते कोसळलं आणि त्यांना त्वरित मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यास सांगितलं गेलं. त्यामुळे नुसतं कारल्याच्या रसावर अवलंबून न राहता, योग्य उपचार, योग्य जीवनशैली व वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.