होळीला काहीच दिवस उरले आहेत. अशातच या सणाची तयारी देखील सुरु झाली आहे. परंतु यादरम्यान स्वतःकडे लक्ष देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. होळी येण्याआधी आपली त्वचा चमकदार आणि तेजस्वी बनवण्यासाठी दह्याचा वापर करणे योग्य ठरेल. दह्यात असलेले प्रोबायोटिक्स आपल्या आरोग्याशी निगडित समस्या दूर ठेवण्यास मदत करते. परंतु दही चेहऱ्याला सुद्धा लावले जाऊ शकते जे चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

चेहऱ्यावर दह्याचा वापर कसा करावा?

दही आणि टोमॅटोपासून बनवलेला फेसपॅक

  • सर्वांत आधी दही एकजीव करा. त्यानंतर त्यात टोमॅटोचा रस मिसळा.
  • आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा.
  • हे मिश्रण पूर्णपणे सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा.

या फेसपॅकमुळे फक्त टॅनिंगच दूर होत नाही, तर चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
tiffin box recipe chavli masala in marathi
Lunch box recipe : ‘चवळी मसाला’ सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी; कशी बनवावी पाहा

Holi 2022: होळी खेळताना स्मार्टफोन सोबत घेऊन जाता येत नाही? ‘या’ टिप्सचा वापर करून फोन ठेवा सुरक्षित

दही आणि काकडीचा फेसपॅक

  • सर्वांत आधी दही एकजीव करा. त्यानंतर त्यात काकडीचा रस मिसळा.
  • आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा.
  • हे मिश्रण पूर्णपणे सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा.

या पेस्टचा वापर करून फक्त टॅनिंगच दूर करता येत नाही, तर तुम्हाला त्वचा चमकदार बनवायची असेल तर हे मिश्रण तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Holi 2022 : होळी खेळल्यानंतर नखं वाईट दिसतात? ‘या’ टिप्स वापरून काढा नखांमध्ये अडकलेला रंग

या गोष्टींची काळजी घ्या :

असे तर, दही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पण त्यामुळे त्वचेवर जळजळ होत असेल तर त्याचा वापर करू नका, कारण त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)