तूप हे जेवणाची चव वाढवते. त्यातील पोषक तत्व हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. तुपामध्ये भरपूर प्रमामात फॅट आढळते. तसेच यात जीवनसत्व अ, क, ई हे जीवनसत्व असतात. तसेच यात ब्युटिरिक अ‍ॅसिड देखील आहे. तूप हे जेवण पचवण्यात मदत करते. तसेच ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यातही मदत करते. तूप खाण्याचे अजून कोणते फायदे आहेत, याबाबत आपण जाणून घेऊया.

१) अन्न पचवण्यास मदत करते

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

तूप खालल्याने आपल्या शरीराला अनेक लाभ मिळतात. ते आपले पाचनतंत्र ठीक राखण्यात मदत करते. तुपाच्या सेवनाने आतड्या चांगल्या पद्धतीने काम करतात. तुपाच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि मूळव्याध या सारख्या समस्या दूर होण्यास सुद्धा मदत होते.

(सहज उपलब्ध असणारे ‘हे’ द्रव्य उच्च रक्तदाब नियंत्रणात आणू शकते)

२) शरीराला निरोगी ठेवते तूप

तुपामध्ये अनेक जीवनसत्वे असतात जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. तुपातील विटामीन ई केस मजबूत ठेवण्यात मदत करतात. तसेच तुपाने केसांमध्ये डँड्रफ आणि खाजेची समस्या देखील होत नाही. जे लोक नियमित तुपाचे सेवन करतात त्यांचे दात देखील मजबूत राहातात.

३) तुपाने भूख आणि झोप वाढते

तूप आपली झोप आणि भूक देखील वाढवण्यास मदत करते. रोज एक चम्मच तूप टाकलेले अन्न खालल्यास झोप येऊ शकते.

४) तुपाने त्वचा चांगली राहाते, हाडे मजबूत होतात

तुपाचे सेवन केल्याने त्वचेला उजळ येतो. दररोज तुपाचे सेवन केल्याने त्वचा सुंदर होऊ शकते. तुपाने हाडे मजबूत होतात. लहान मुलांना तुप खाऊ घालणे फायदेशीर ठरू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)