Mallika Sherawat shares fitness tips: निरोगी आणि फीट राहण्यासाठी लोक अनेकदा सेलिब्रिटींना फॉलो करतात. कलाकार त्यांच्या फिटनेसने कायम सामान्यांना प्रभावित करत असतात. बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतनेही तिच्या फिटनेस काही टिप्स शेअर केल्या आहेत. फिटनेसच्या बाबतीत वय हा फक्त एक आकडा आहे हे ती सिद्ध करत आहे. ४८ वर्षीय मल्लिका शेरावतने तिच्या फिटनेस, टोन आणि निरोगी जीवनशैलीने लोकांना आश्चर्यचकीत केलं आहे. या वयातही तिने तिचं वजन योग्य राखलं आहे आणि आजारपणापासून स्वत:ला दू ठेवलं आहे.
मल्लिका शेरावतने तिच्या जिम वर्कआउटचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “आरोग्यासाठी कोणतेही शॉर्टकट नाहीत. नियमित व्यायाम आणि दिनचर्येत सातत्य हीच खरी शक्ती आहे.” या व्हिडीओमध्ये मल्लिका काळ्या रंगाच्या टॉप टाइट्समध्ये व्यायाम करताना दिसत आहे. तिची फिटनेस कन्सेप्ट सिद्ध करते की सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आणि योग्य व्यायाम तुम्हाला कोणत्याही वयात फिगर उत्तम राखण्यासाठी मदत करू शकतात.
मलिल्काचा दिनक्रम
मल्लिकाचा व्यायाम हा कार्डिओ आणि स्ट्रेंग्थ ट्रेनिंग याचे संतुलित संयोजन आहे. या व्यायाम प्रकारात संपूर्ण शरीरातील स्नायूंवर लक्ष केंद्रित केलं जातं. तीतिच्या सेशनची सुरूवात सायकलिंगने करते. हा कार्डिओ व्यायाम केवळ सहनशक्ती वाढवत नाही तर ह्रदयाचे आरोग्यदेखील सांभाळतो. तसंच शरीराला अवघड व्यायामासाठी तयार करतो.
लेग कर्ल
कार्डिओनंतर मल्लिका लेग कर्ल करते. यामुळे हॅमस्ट्रिंग्ज आणि कमरेखालच्या शरीराला बळकटी मिळते. हा व्यायाम टोन आणि मजबूत पायांसाठी महत्त्वाचा आहे. वयानुसार पायांचे स्नायू मजबूत ठेवणं गरजेचं आहे.
दोरी ओढणे
यानंतर ती दोरी ओढण्याचा व्यायाम करते. हा एक अप्पर बॉडीचा अतिशय तीव्र प्रकारातला व्यायाम आहे. यामध्ये हात, खांदे आणि पाठीच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित केले जाते. या सर्व व्यायाम प्रकारांना एकत्रित करून मल्लिका एक संतुलित सत्र तयार करते.
मानसिक आरोग्यही महत्त्वाचे
केवळ जिममध्येच नाही तर ती मानसिर आरोग्य आणि एकूण निरोगीपणावर लक्ष केंद्रित करते. ती अॅक्युपंक्चर आणि साउंड हिलिंग सत्रांमध्येही भाग घेते. “विकेंड रिसेट, अॅक्युपंक्चर आणि साउंच हिलिंग हे माझ्या दिनचर्येतील महत्त्वाच्या गोष्टी आहेत”, असं ती म्हणते. फिटनेससह मानसिक आरोग्य आणि स्ट्रेबस व्यवस्थापनही तेवढंच महत्त्वाचं आहे असं मल्लिकाचं मत आहे.