भगवान बुद्धांची जयंती वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून संपूर्ण जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. त्यांनी जगाला पंचशील उपदेश दिले. हे पंचशील आहेत – हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका आणि मादक पदार्थ घेऊ नका. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांची उपासना केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढते. त्याच्या जीवनात समृद्धी आणि आनंद वाढतो. याशिवाय बुद्ध पौर्णिमेला व्रत केल्याने व्यक्तीच्या पापांचा नाश होतो आणि तो मोक्षमार्गाकडे वाटचाल करतो.

बुद्ध पौर्णिमा तिथी आणि शुभ मुहूर्त

वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा तिथी १५ मे रोजी मध्यरात्री १२.४५ पासून सुरू होईल आणि सोमवार, १६ मे रोजी रात्री ९.४३ पर्यंत चालेल. त्यामुळे १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी व्रत पाळण्यात येणार असून विधिवत पूजा करण्यात येणार आहे.

(हे ही वाचा: Lunar Eclipse 2022: ‘या’ राशींना चंद्रग्रहणामुळे करिअरमध्ये होऊ शकते प्रचंड प्रगती, धनलाभाचे आहेत योग!)

बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व

गौतम बुद्धांच्या जन्म आणि मृत्यूच्या वेळेबद्दल मतमतांतरे आहेत. परंतु अनेक इतिहासकारांनी त्याच्या जीवनकाळ ईसापूर्व ५६३-४८३ असा सांगितलं आहे. असे म्हणतात की गौतम बुद्ध राजवैभव सोडून वर्षानुवर्षे जंगलात भटकले आणि त्यांनी बोधगयेतील बोधीवृक्षाखाली कठोर तपश्चर्या करून सत्याचे ज्ञान प्राप्त केले. यानंतर भगवान गौतम बुद्धांनी आपल्या ज्ञानाने संपूर्ण जगात नवा प्रकाश निर्माण केला.

(हे ही वाचा: जाणून घ्या कोण होते लाफिंग बुद्धा? त्यांची मूर्ती अनेक घरांमध्ये का ठेवली जाते?)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)