चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांपैकी एक होते. आचार्य चाणक्य यांना विविध विषयांचे ज्ञान होते. ते त्या काळातील प्रसिद्ध अशा तक्षशिलात विद्यार्थ्यांना शिक्षण देत असत. चाणक्य यांना आचार्य चाणक्य आणि कौटिल्य असेही संबोधलं जातं. चाणक्य यांच्या मते, संकटाच्या वेळी कधीही संयम सोडू नये. संकट मोठे असेल तर सर्वांनी संघटित होऊन त्याचा सामना केला पाहिजे. संकटाचा सामना करण्यासाठी चाणक्य यांनी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचं पालन केल्यास नुकसान टाळता येते. करोना संकटातही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले नियम लागू होतात.

संकटाच्या वेळी निष्काळजीपणा महागात पडू शकतो: चाणक्यच्या मते, जर तुम्हाला शक्तिशाली शत्रूचा पराभव करायचा असेल तर सर्वात आधी रणनीती बनवायला हवी. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. चाणक्य नीतीनुसार, संकटाच्या वेळी प्रथम स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानंतर इतर लोकांनाही याबाबत जागृत केले पाहिजे. कोणतीही लढाई जिंकण्यासाठी नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. करोनासारखे आजार टाळण्यासाठी तज्ज्ञ आणि सरकारने नियम सांगितले आहेत. या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे शहाणपणाचे आहे. तरच या शत्रूपासून स्वतःचे व इतरांचे रक्षण करता येईल.

सज्ज राहा: चाणक्य नीतीनुसार संकटकाळी सज्ज राहणं गरजेचं आहे. जागृती संकटापासून वाचवते. संकटकाळी जागरुक असायला हवे. शक्य असल्यास, इतरांनाही जागरूक करण्याचा प्रयत्न करा. संकटाला घाबरू नका. योग्य सल्ला, ज्ञान, अनुभव आणि धैर्याने संकट टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बायकोचा वाढदिवस किंवा लग्नाची तारीख लक्षात राहात नाही?, व्हॉट्सअ‍ॅपच्या मॅसेज शेड्युल फिचरमुळे होईल मदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शक्तिशाली व्हा: चाणक्य नीतिनुसार कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. चाणक्य यांचा विश्वास होता की, आरोग्य चांगले असेल तर कोणताही रोग त्याला स्पर्श करू शकणार नाही. यशासाठी स्वत:चे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. कारण कोणतेही आव्हान केवळ निरोगी असण्याच्या स्थितीतच लढता येते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत.