आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्याप्रकारे घर्षण, कापणे, उष्णता आणि मार सहन केल्यानंतर सोन्याची खरी परख होते. त्याचप्रकारे व्यक्तीची ओळख त्याच्या गुणांनी केली जाते. व्यक्तीचे हेच गुण त्याचं आचरण दर्शवतात. यात त्यांनी व्यक्तीच्या अशा काही वाईट सवयींचा उल्लेख केलाय, ज्यामुळे आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाहीत. त्यामुळे या वाईट सवयींपासून सर्वांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे.

१. असं म्हटलं जातं की वेळ कोणासाठी थांबत नाही. गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे वेळेचे मूल्य समजले पाहिजे. आयुष्यात फक्त तेच लोक यशस्वी होतात ज्यांना वेळेची किंमत समजते. कोणतंही ध्येय तेव्हाच साध्य होतं जेव्हा एखादी व्यक्ती वेळेवर योग्य निर्णय घेते. जे लोक वेळेचा चांगला वापर करतात, ते आपले ध्येय सहजपणे साध्य करू शकतात. अशा लोकांवर आई लक्ष्मीची कृपा सदैव राहते.

२. चाणक्य नीतिमध्ये आळस हा देखील मानवाच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा असल्याचं सांगितलं आहे. जो व्यक्ती आळशी आहे, तो आलेल्या संधीचा फायदा घेण्यास मुकतो. आळशी व्यक्ती कोणतंही काम वेळेवर पूर्ण करू शकत नाही, ज्यामुळे यश मिळण्यास बराच विलंब होतो. त्यामुळे आळशीपणापासून दूर राहिले पाहिजे. जे लोक आळशीपणापासून दूर राहतात त्यांच्यावरही आई लक्ष्मी कृपा करते.

३. आचार्य चाणक्य सांगतात, ज्यांना मेहनत करायला भीती वाटते, त्यांनाही यश मिळत नाही. अशा लोकांकडे नेहमीच पैशांची कमतरता असते. कारण मेहनतीशिवाय यश शक्य नाही. म्हणून मेहनत करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीने स्वतःला नेहमी मादक पदार्थांपासून दूर ठेवलं पाहिजे. कारण कोणत्याही प्रकारची नशा आपल्या आरोग्यावर तसंच आपल्या मेंदूवर परिणाम करते. एखादी व्यक्ती सक्षम आणि कार्यक्षम असूनही चांगली कामगिरी करण्यापासून वंचित राहते. अंमली पदार्थांचे व्यसन केल्याने योग्य आणि अयोग्य गोष्टी ओळखता येत नाही. अशा लोकांवर सुद्धा आई लक्ष्मी कृपा करीत नाही.