कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, पण कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करणारे जनुकीय उपचार विकसित करण्यात आले आहेत. यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण निम्म्याने कमी होते. आरएनए इंटरफिअरन्स थेरपी असे या तंत्राचे नाव असून त्यात कोलेस्टेरॉल वाढीस कारणीभूत ठरणारी जनुकीय कळ बंद केली जाते. ब्रिटनमधील लंडनच्या इंपीरियल कॉलेजच्या संशोधकांनी याबाबत चाचण्या घेतल्या असून वर्षांतून दोनदा ही उपचार पद्धत वापरल्यास कोलेस्टेरॉल कमी होते. यात स्टॅटिन औषधांवर अवलंबून राहावे लागत नाही. जनुकीय उपचार पद्धतीत इनक्लिसिरान हे औषध वापरले जाते. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात टाळता येतो कारण त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत असते. ही उपचार पद्धती साधी सोपी व सुरक्षित आहे असा दावा इंपिरियल कॉलेजच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रा. कौशिक रे यांनी केला आहे. स्टॅटिन, एझेटेमाइब या औषधांनी कोलेस्टेरॉल जेवढे कमी होते. त्यापेक्षाही ते यात जास्त प्रमाणात खाली येते. एलडीएल हे वाईट कोलेस्टेरॉल मानले जाते. ते वाढल्यास हृदयविकार व रक्तवाहिन्या अवरुद्ध होतात. सध्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी स्टॅटिन औषधे वापरली जातात. पण अनेक रुग्ण त्याचे जास्त प्रमाण सहन करू शकत नाहीत. इनक्लिसिरान औषध मात्र चाचण्यात यशस्वी ठरले असून त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. ४९७ रुग्णांवर त्याचे प्रयोग केले असता तीन महिन्यात चांगला फरक दिसून आला. एका महिन्यात एलडीएलचे प्रमाण ५१ टक्के कमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cholesterol medicine
First published on: 19-03-2017 at 01:04 IST