गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस संपूर्ण उत्तर भारतात रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी अनेकांना रोज रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ करायला आवडते. उष्ण वातावरणात थंड पाण्याने अंघोळ केल्याने ताजेपणा जाणवतो. या ऋतूत अनेक जण दररोज अनेक वेळा अंघोळ करतात. आता प्रश्न पडतो की, रात्री थंड पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर की हानिकारक? या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना डॉ. सुकृती भल्ला यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरी आल्या आल्या लगेच अंघोळ करता?

बाहेरील उन्हामुळे शरीराचं तापमान वाढलेलं असतं, अशात जर तुम्ही घरी आल्या आल्या लगेच अंघोळीला गेलात तर शरीराचं तापमान बदलतं. यामुळे घसा खवखवणे, सर्दी इत्यादी आजार होऊ शकतात. तेव्हा उन्हातून घरी आल्यावर अर्धा तासानंतर अंघोळ करावी. जास्त वेळ शॉवर घेऊ नये, असंही डॉक्टर विनित बंगा सांगतात. डॉक्टर पुढे सांगतात, थोडक्यात शॉवर घेतल्याने त्वचेची जळजळ होते.कारण जास्त वेळ गरम पाण्यानं अंघोळ केल्यास त्वचेचे नैसर्गिक तेज निघून जाते, ज्यामुळे कोरडेपणा येतो आणि उष्मा पुरळ होण्याची शक्यता वाढते.

जेव्हा आपण अंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीरावरील छिद्र उघडले जातात. यामुळे तुम्ही जितके जास्त शॉवर घ्याल तितकीच उष्णता वाढेल. डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होते आणि गुठळ्या होतात, ज्यामुळे पल्मोनरी एम्बोलिझम होतो, जे सहसा हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा वाईट असते. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवले पाहिजे, जास्तीत जास्त पाणी प्यायले पाहिजे.

हेही वाचा >> शाहरुख खानला झाला उष्माघाताचा त्रास; वयाच्या पन्नाशीनंतर निर्जलीकरण कसे टाळावे?

काही लोक उन्हाळ्यात दिवसातून अनेकदा अंघोळ करतात. अंघोळ केल्याने फ्रेश वाटत असलं तरी हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरते. वारंवार अंघोळ केल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तेव्हा लक्षात ठेवा उन्हाळ्यातसुद्धा दिवसातून केवळ दोन वेळाच अंघोळ करा. उन्हातून घरी गेल्यावर तहान लागते; अशावेळी काही जण थंड पाणी अथवा बर्फ टाकलेलं सरबत पिणं पसंत करतात. परंतु, असं केल्याने आजारांना आमंत्रण मिळू शकतं. उन्हातून आल्यावर अचानक थंड पाणी प्यायल्याने सर्दी, खोकलासारख्या समस्या होऊ शकतात.

अंघोळ करताना किती वेळ शॉवर घेतला पाहिजे ?

तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी सकाळी ११ च्या सुमारास किंवा संध्याकाळी अंघोळ करण्याचा प्रयत्न करा. खोलीच्या तापमानाच्या पाण्यात ५-१० मिनिटे अंघोळ करा. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी शरीरातील ऊर्जा वाढवणे अत्यंत आवश्यक आणि तितकेच महत्त्वाचे आहे. पुरेसे पाणी पिणे हे तुमच्या पचन आणि ऊर्जेच्या पातळीला फायद्याचे ठरते आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experts answer why you should take shorter showers during a heatwave srk
First published on: 24-05-2024 at 11:12 IST