Cooking oil and cancer : बदलत्या जीवनशैलीत आहारातील खाद्यतेलाचा वापर हा सार्वजनिक आरोग्याचा विषय ठरला आहे. कोणते तेल वापरावे आणि कोणते वापरू नये, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. रोजच्या जेवणात आपल्याला तेल लागतंच, तेलाशिवाय आपलं जेवण पूर्णच होऊ शकत नाही. मात्र, ते तेल आरोग्याच्या दृष्टीनं योग्य आहे का ते पाहणं गरजेचं आहे. आजकाल लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. काही अंशी त्याचं मूळ हे तेलाशीही निगडित आहे आणि त्यामुळे जे तेल आपण वापरणार असू, ते पौष्टिक असणं हे आता फार महत्त्वाचं ठरू लागलेलं आहे. तुम्हाला हे माहीत आहे का की, कुकिंग ऑइल म्हणजेच खायच्या तेलानं तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. अमेरिकन सरकारद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये दावा करण्यात आला आहे की, खाद्यतेलामुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. हा धोका खासकरून तरुणांना असतो. हे संशोधन मेडिकल जर्नल गटामध्ये प्रकाशित झाले आहे. त्यात सांगण्यात आलं आहे की, सूर्यफूल, द्राक्ष्याच्या बिया, कॅनोला व मक्याच्या दाण्यांपासून तयार केल्या गेलेल्या तेलाच्या सेवनाने कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

भारतात कर्करोगाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे कर्करोग टाळण्यासाठी स्वयंपाक करताना हानिकारक घटक नसलेलं तेल वापरणं महत्त्वाचं आहे. कोणतंही तेल पूर्णपणे ‘कर्करोगमुक्त’ नसलं तरी ते तेल ज्या पद्धतीनं बनवलं जातं किंवा भेसळ होते, त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. काही वेळा तेल जास्त वेळा गरम करणं, परत परत वापरणं यामुळेही कर्करोगाचा धोका वाढतो. तुम्हाला कॅन्सर टाळायचा असेल, तर खाण्यासाठी योग्य तेल निवडणं तुमच्या हातात आहे.

संशोधनानुसार सूर्यफूल, मका, द्राक्ष व कॅनोलाच्या बियांपासून बनवलेल्या तेलाचं सेवन केल्यानं कोलन कॅन्सरचा धोका वाढतो. त्यातून जळजळ होण्यासंबंधीचे रोग होतात. या तेलामुळे शरीर ट्यूमरशी लढण्यास कमकुवत होते. या प्रकारच्या तेलाचा वापर प्रक्रिया केलेले पदार्थ बनविण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले अन्नही आतड्याच्या कर्करोगाचे कारण मानले जात आहे.अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडामधील तज्ज्ञांनी कोलन कॅन्सरवर संशोधन केले आहे, जे मंगळवारी जर्नल गटामध्ये प्रकाशित झाले. या अभ्यासात ३० ते ८५ वयोगटातील लोकांचा सहभाग होता. त्यात आढळून आलं की, ५० वर्षांखालील तरुणांमध्ये कोलन कॅन्सरची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ९० टक्के प्रकरणांमध्ये रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातील कॅन्सरने ग्रस्त होतो. त्यातील अर्ध्याहून अधिक रुग्णांना अ‍ॅडव्हान्स टप्प्याचा कॅन्सर होता, जो उपचारांना खूप आव्हानात्मक आहे. संशोधनाच्या आकडेवारीनुसार, एक अमेरिकन तरुण वर्षभर सरासरी १०० पौंड बियांचे तेल वापरतो.

हेही वाचा >> हिवाळ्यात केस गळणे कसे कमी करावे? या ५ टिप्स फॉलो करा; केस राहतील दाट, मुलायम…

घाण्याचे तेल सर्वोत्तम!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या तेलावर सर्वांत कमी प्रक्रिया केली जाते, ते तेल आरोग्यासाठी सर्वांत चांगलं असतं. पॅकबंद तेल दोनदा फिल्टर होत असल्यानं त्यातील आवश्यक सत्त्वं नाहीशी होतात. घाण्याद्वारे काढलं गेलेलं खाद्यतेल कधीही आरोग्यासाठी चांगलंच असतं. त्यातून नैसर्गिक पोषणमूल्य योग्य प्रमाणात मिळतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. शेंगदाणा, मोहरी, खोबरे व सूर्यफूल यांचं घाण्याचं तेल आरोग्यासाठी उत्तम असतं.