तुम्ही घर, वाहन किंवा इतर मोठ्या गोष्टी घेण्यासाठी कर्ज घेतो. त्याप्रमाणे शिक्षणासाठीही कर्ज घेता येतं. तुम्ही इतर कर्जांची परतफेड हप्त्याने करतात, तशीच परतफेड केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळेपर्यंत सहा महिने ते वर्षभराचा कालावधी दिला जातो. या कालावधीनंतर तुमचे हफ्ते सुरू होतात. उच्च पदाचे शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जा व त्याच बरोबर परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढल्याने शैक्षणिक कर्जाची सुविधा मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक स्वप्नं पूर्ण करण्यास मदत मिळत आहे. अनेकदा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक हुशार मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी शैक्षणिक कर्ज सुविधा अत्यंत मोलाची ठरते.
प्रत्येकाला एका मोठ्या पदावर काम करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची एक इच्छा असते. या करिता शिक्षण खूप महत्वाचे आहे. उच्च शिक्षण म्हणजे पदव्युत्तर शिक्षण किंवा वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचा खर्च मोठा असल्यानं अनेकांना तो परवडत नाही. अशा वेळी अनेक मुलं आपलं स्वप्न बाजूला ठेवून दुसऱ्या अभ्यासक्रमाची निवड करतात.मात्र आता शैक्षणिक कर्ज सुविधेमुळे अशा अनेक मुलांना त्यांची स्वप्नं पूर्ण करणं शक्य झालं आहे. देशातल्या अनेक आघाडीच्या बँका शैक्षणिक कर्ज देतात. शैक्षणिक कर्ज घेताना त्याची निवड कशी करावी, याबाबत आपण जाणून घेऊ या.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
कर्जाची कमाल रक्कम : गरजेवर आधारित
कर्जाचा कमाल कालावधी : १५ वर्षं
जामीन : ७.५ लाखांपर्यंत शून्य
मार्जिन :४ लाखांपर्यंत शून्य
भारतीय रहिवासी आणि परदेशात जन्मलेल्या, परंतु भारतात शिक्षण घेऊ इच्छित असलेल्या भारतीय मुलांना कर्ज दिलं जातं.
कर्जरकमेच्या १२५ टक्के सिक्युरिटी असेल.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ६ महिने ते १ वर्षानंतर कर्ज परतफेडीसाठी हप्ता सुरू होईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
स्टेट बॅंकेतर्फे मुलींसाठी सवलतीच्या दराने २० लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं.
कर्जाचा कमाल कालावधी : १५ वर्षं
जामीन : ७.५ लाखांपर्यंत शून्य
मार्जिन : ४ लाखांपर्यंत शून्य
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर १२ महिन्यांचा अधिस्थगन कालावधी.
उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी दुसरं कर्ज मिळू शकतं.
अॅक्सिस बँक (Axis Bank)
कर्जाची कमाल रक्कम : १ कोटी रुपये
कर्जाचा कमाल कालावधी : १५ वर्षं
मार्जिन : ४ लाखांपर्यंत शून्य
प्रोफाइलच्या आधारे प्रवेशापूर्वी कर्ज निश्चित करू शकता.
बँकेला तुमचा संपूर्ण अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून १५ व्यावसायिक दिवसांच्या आत कर्जवाटप होतं.
काम करत शिक्षण घेणाऱ्यांसाठी २० लाखांपर्यंत कर्ज.
बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda)
कर्जाची कमाल रक्कम : रु.८० लाख
कर्जाचा कमाल कालावधी : १०-१५ वर्षं
जामीन : १००% मूर्त सुरक्षा
मार्जिन : ४ लाखांपर्यंत शून्य
नर्सरीपासून शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे.
निवडक शैक्षणिक कर्ज योजनांवर मोफत डेबिट कार्ड
विद्यार्थिनींसाठी सवलतीचे व्याजदर.
एचडीएफसी बँक (HDFC bank)
कर्जाची कमाल रक्कम : भारतातल्या शिक्षणासाठी २० लाख, तर परदेशासाठी ३५ लाख (कोणत्याही जामीनदाराशिवाय) जामीनदार असल्यास कर्जाला मर्यादा नाही.
कर्जाचा कमाल कालावधी : १५ वर्षं
जामीन : ७.५ लाखांपर्यंत शून्य
उच्च श्रेणीतली महाविद्यालयं आणि विद्यापीठांनुसार व्याजदर
परदेशातल्या शैक्षणिक कर्जामध्ये ३६ देशांमधल्या ९५० पेक्षा जास्त अभ्यासक्रमांसाठी कर्ज दिलं जातं.
वेगळ्या शहरातला सह-कर्जदार चालू शकतो.
टाटा कॅपिटल शैक्षणिक कर्ज (TATA capital)
कर्जाची कमाल रक्कम : रु. ३० लाख
कर्जाची कमाल मुदत : ६ वर्षं
जामीन : ४ लाखांपर्यंत शून्य
तुमच्या सोयीनुसार तीन कर्ज हप्त्यांचे पर्याय उपलब्ध
किमान कागदपत्रं आणि कर्जाची जलद मंजुरी.
या बँका आणि वित्तीय संस्थांकडून दिलं जाणारे कर्ज, व्याजदर, अन्य अटी याची माहिती घेऊन तुम्हाला सोयीच्या ठरणाऱ्या ठिकाणाहून तुम्ही आपल्या पाल्यासाठी कर्ज घेऊ शकता आणि त्याचं उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करू शकता. ही माहिती वेळोवेळी अपडेट होत असते.