Foods to Lower Cancer Risk: कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे, जो शरीराच्या कोणत्याही भागात कधीही होऊ शकतो. हा आजार तेव्हा होतो, जेव्हा शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि निरोगी पेशींना नुकसान पोहोचवतात. कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे. जर हा आजार वेळेवर ओळखला गेला नाही तर तो प्राणघातक ठरू शकतो. कर्करोगाच्या आजारासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. जसे की धूम्रपान आणि तंबाखूचे जास्त सेवन, जास्त तळलेले, चरबीयुक्त आणि कमी पोषक अन्न कर्करोगास कारणीभूत ठरतात. शरीराची हालचाल कमी असणे, जास्त काळ प्रदूषणात राहणे आणि विषाणूजन्य संसर्ग यामुळेदेखील कर्करोग होऊ शकतो. या आजारासाठी अनुवांशिक कारणेदेखील जबाबदार आहेत.

आयुर्वेदिक आणि युनानीतज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांच्या मते, शरीरात कर्करोगाची लक्षणे बऱ्याचदा खूप उशिरा आढळतात. जेव्हा लक्षणे आढळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. काही प्रकारचे कर्करोग, जसे की स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोग जर लवकर लक्षात आले तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात.

या आजाराला कधीही बळी पडू नये म्हणून आपण आपला आहार आणि जीवनशैली बदलली पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले. या आजारापासून बचाव करण्यासाठी जीवनशैली बदलणे महत्त्वाचे आहे आणि आहारात काही पदार्थांचे सेवन करणेदेखील महत्त्वाचे आहे. असे काही पदार्थ आहेत, जे कर्करोग रोखण्यात जादूचा प्रभाव पाडतात. या आजारापासून बचाव करण्यासाठी जीवनशैली बदलणे महत्त्वाचे आहे आणि काही पदार्थांचे सेवन करणेदेखील महत्त्वाचे आहे. कर्करोग रोखायचा असेल तर काही पदार्थांचं सेवन केलं पाहिजे.

बेरी खा

बेरी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे. बेरीमध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि अँथोसायनिन, एलाजिक अॅसिड आणि रेझवेराट्रोलसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कर्करोग रोखतात. तुम्ही नाश्त्यात स्मूदीच्या स्वरूपात आणि शेक बनवून निळ्या, जांभळ्या आणि लाल बेरी खाऊ शकता.

भाज्या खा

भाज्यांमध्ये ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी यांचा समावेश आहे. या भाज्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात, जे कर्करोगासारख्या आजारांनादेखील प्रतिबंधित करतात. हे पदार्थ वारंवार खाल्ल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. या भाज्या भाजून किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवून खाऊ शकता.

मासे खा

मासे हे पोषक तत्वांनी आणि प्रथिनांनी समृद्ध असतात, जे शरीर निरोगी ठेवतात आणि कर्करोग रोखतात. सॅल्मन, ट्यूना आणि अँकोव्हीजसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे जळजळ नियंत्रित करतात. याचे सेवन केल्याने स्तनाचा कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोग टाळता येतो.

ड्रायफ्रूट्स खा

अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चनुसार, सर्व ड्रायफ्रूट्स, विशेषतः अक्रोडमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म असतात. फायबर आणि निरोगी चरबीयुक्त ड्रायफ्रूट्स नाश्त्यात खाऊ शकता. तुम्ही ड्रायफ्रूट्स असेच किंवा स्मूदीच्या स्वरूपात खाऊ शकता.

डार्क चॉकलेट खा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डार्क चॉकलेट हा कर्करोग रोखण्यासाठी एक उत्तम आहार मानला जातो. डार्क चॉकलेट कर्करोग पूर्णपणे रोखत नाही, परंतु डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे विशेष घटक कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स जळजळ कमी करण्यास मदत करतात. डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर पोषक घटक असतात, जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.