झोप ही आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. झोप कमी झाली किंवा जास्त झाली तरी त्याचे परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतातच. दिवसातील अनेक तास काम केल्यावर रात्री आपल्या शरीराला आरामाची गरज असते. यामुळे डोक शांत होण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी ताजेतवाने होऊन दिवस सुरु करण्यासाठी मदत होते. या झोपेचेही काही तास ठरलेले असतात. काही किमान तासांची झोप आपल्या शरीराला गरजेची असते. झोप पूर्ण न झालेल्यांना आजारांचाही सामना करावा लागतो. या संदर्भात नुकताच एक अभ्यास करण्यात आला आहे. ज्यात एक सर्व्हे घेऊन शेवटी त्याचे निकष मांडण्यात आले आहे.

काय सांगतो हा अभ्यास?

अ‍ॅनाल्स ऑफ बिहेव्होरल मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, सलग आठ रात्री सहा तासांपेक्षा कमी झोपेच्या दुष्परिणामांचा अभ्यास केला गेला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार झोपेचा किमान कालावधी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे. दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठातील स्कूल ऑफ एजिंग स्टडीजचे सहायक प्राध्यापक सोमी ली यांना फक्त एक रात्र न झोपलेल्यामध्येही खूप बदल जाणवला. अशा लोकांमध्ये तिसर्‍या दिवसापासून मानसिक आणि शारीरिक समस्यांची संख्या सातत्याने वाढत गेली. संशोधनात असे दिसून येते की मानवी शरीराला सातत्त्याने झोप न येण्याची सवय लागते. परंतु सातत्याने सहा दिवस न झोपल्यास जास्त वाईट लक्षणे दिसून येतात. ज्यामुळे सहाजिक शाररीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

एकाच दिवशी झोप पूर्ण होऊ शकत नाही

सोमी ली म्हणतात की, “आपल्यापैकी बर्‍याच जणांना असे वाटते की आठवड्याच्या शेवटी खूप तासाची झोप काढून आपण न झोपलेल्या रात्रीची झोप पूर्ण करू शकतो. परंतु याचा काहीही फायदा होत नाही. अभ्यासानुसार असं लक्षात आलं आहे की, फक्त एका रात्री न झोपल्यामुळे पुढचा पूर्ण दिवस खराब होऊ शकतो.”

झोप पूर्ण न झाल्यास काय परिणाम होतात?

अमेरिकेच्या अभ्यासात मिड लाइफने दिलेल्या डेटामध्ये तुलनेने निरोगी आणि सुशिक्षित जवळपास २००० मध्यमवयीन प्रौढांचा समावेश आहे. त्यापैकी ४२ टक्के १ रात्र न झोपलेल्या आणि नेहमीच्या झोपेपेक्षा दीड तास कमी झोपलेल्या लोकांवरती परिणाम जाणवले. या लोकांनी सतत आठ दिवस डायरीत त्यांच्या मानसिक आणि शारिरीक वर्तनांची नोंद केली. यामध्ये असे लक्षात आले की, निद्रानाश  झाल्याने संतापलेली, चिंताग्रस्त, एकाकी, चिडचिडी आणि निराश झालेल्या भावना काही टक्के लोकांना जाणवल्या. तर काहींना शारिरीक समस्या, वेदना, लैंगिकदृष्ट्या कार्यशील समस्या आणि आरोग्याच्या इतर समस्यांसारखी अधिक शारीरिक लक्षणे दिसून आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.