नॉनस्टिक पॅन्स आजकाल प्रत्येक स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग बनले आहेत. लोकांना नॉन-स्टिक पॅनमध्ये अन्न शिजविणे सोपे वाटते. वास्तविक, अन्न शिजवताना जळत नाही किंवा चिकटत नाही. अशा गोष्टी या नॉन-स्टिक पॅनमध्ये अगदी सहज शिजवल्या जाऊ शकतात, ज्या सामान्य पॅनमध्ये बनवणे खूप कठीण आहे. वास्तविक, नॉन-स्टिक पॅनच्या वरच्या पृष्ठभागावर एक विशेष कोटिंग केले जाते, ज्यामुळे अन्न शिजवताना चिकटत नाही. पण याचा अर्थ असा नाही की स्वयंपाकघरातील सर्व पदार्थ नॉन-स्टिक पॅनमध्ये बनवावे. मात्र अशा काही गोष्टी आहेत. ज्या तुम्ही नॉन-स्टिक पॅनमध्ये चुकूनही शिजवू नका. कारण याने तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी कधीही शिजवू नयेत.

या गोष्टी कधीही नॉनस्टिक पॅनमध्ये बनवू नयेत

स्ट्राय फ्राय भाजी बनवू नये.

खरतर स्ट्राय फ्राय भाजी ही एक डिश आहे जी उच्च आचेवर बनवली जाते आणि ती कॅरॅमलाइझ करावी लागते परंतु नॉन-स्टिक पॅन उच्च आचेची उष्णता कमी करते. नॉन-स्टिक पॅनला जास्त उष्णता देऊ नये. त्यामुळे त्यांच्या आवरणावर परिणाम होतो आणि विषारी घटक अन्नामध्ये विरघळू लागतात, आणि याचे तुमच्या आरोग्याला दुष्परिणाम होतील.

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…

जास्त वेळ भाज्या शिजवू नका

नॉन-स्टिक पॅनमध्ये जास्त वेळ भाज्या शिजवू नका. जास्त वेळ उष्णता दिल्यास त्याचा लेप वितळण्यास सुरुवात होते आणि त्यातून निघणारा विषारी घटकामुळे अन्न विषारी बनते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. वास्तविक त्याचा लेप ५०० अंश फॅरेनहाइटवर वितळू लागतो. हे देखील लक्षात ठेवा की जेवणाच्या भांड्यात कधीही थेट उष्णता देऊ नका.

स्वयंपाक करताना तुम्ही जर सॉस, सूप, मांस, खीर किंवा कोणतीही डिश मंद आचेवर जास्त वेळ शिजवता, नातर काही वेळाने कोणतेही पदार्थ तळाशी चिकटू लागले असेल तर असे पदार्थ नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नयेत. यामुळे तुमच्या पॅनचा लेप खराब होतो आणि ते आरोग्यासाठीही हानिकारक आहे.

या गोष्टींसाठी नॉन-स्टिक पॅन वापरा

नॉन-स्टिक पॅनमध्ये तुम्ही ऑम्लेट, मासे, चिकन, नूडल्स इत्यादी सहज शिजवू शकता. हे सर्व पदार्थ खूप लवकर शिजले जातात आणि त्यांना जास्त काळ शिजवण्याची गरज नसते. त्यामुळे त्यावर मिक्स्ड व्हेज, चिली, ऑम्लेट यांसारख्या गोष्टी अगदी छान बनवता येतात.