Corona Vaccine for Kids (Age 6-12): करोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे. मुलांमध्येही संसर्ग दिसून येत आहे. दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI ने लहान मुलांसाठी लस देण्यास मान्यता दिली आहे. कोवॅक्सिन ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मीळाली. याशिवाय, Zycov-D लस १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे.

लसीकरण केव्हा आणि कुठे केले जाईल?

६ ते १२ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण कधी आणि कुठे केले जाईल, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या १२-१४ वर्षे वयोगटातील मुलांना Corbevax लस दिली जात आहे. १५-१७ वर्षे वयोगटातील मुलांना कोवॅक्सिनचा डोस दिला जात आहे. स्लॉट बुकिंगनुसार या वयातील मुलांना जवळच्या केंद्रांवर लसीकरण करता येते.

लसीसाठी नोंदणी आवश्यक?

होय, जर तुमच्या घरात १२ ते १४ वर्षांची मुले असतील, तर त्यांना लसीकरण करण्यासाठी, तुम्हाला प्रथम CoWIN पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी लागेल.

लसीसाठी नोंदणी कशी करावी?

  • १.तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर CoWIN अॅप उघडा.
  • २.वर दिलेल्या नोंदणी/साइन इन/लॉगिन पर्यायावर जा.
  • ३. तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
  • ४. आता मोबाईलवर एक OTP येईल, तो टाका.
  • ५. तुमच्या क्षेत्राचा पिनकोड टाका.
  • ६. तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राची यादी उघडेल.
  • ७. आता मुलाचा तपशील विचारला जाईल. त्यात नाव आणि वय टाका.
  • ८. आधार हा मुलाचा ओळखपत्र म्हणून दिला जाऊ शकतो.
  • ९. जर आधार कार्ड उपलब्ध नसेल, तर फक्त शाळेच्या ओळखपत्राचा तपशील द्या.
  • १०. शेवटी, तुमच्यानुसार तारीख आणि वेळ निवडा आणि स्लॉट बुक करा.
  • ११. स्लॉट बुक केल्यानंतर मोबाईलवर कन्फर्मेशन मेसेज येईल.

पैसे द्यावे लागतील का?

नाही, सरकारकडून मुलांना मोफत लसीकरण केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लस किती दिवसात दिली जाईल?

  • १. Corbevax चे दोन डोस लागतील. दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असेल.
  • २. Covaxin चेही दोन डोस दिले जातील. दोन्हीमध्ये २८ ते ४० दिवसांचे अंतर असेल.
  • ३. Zycov-D लस ही तीन डोसची लस आहे. तिसरी लस पहिल्यापासून २८ दिवसांनी आणि दुसरी लस ५६ दिवसांनी दिली जाईल. मात्र, मुलांना फक्त दोनच डोस दिले जातील.

आतापर्यंत एकूण किती लसीकरण झालं?

  • १. ३ जानेवारी २०२२ पासून मुलांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली.
  • २. सुरुवातीच्या काळात, कोवॅक्सिन फक्त १५-१७ वर्षांच्या मुलांनाच दिले जात होते.
  • ३. १६ मार्चपासून १२ वर्षांवरील बालकांचे लसीकरण सुरू झाले.
  • ४. २.७ कोटी पहिला डोस आणि ३७ लाख दुसरा डोस १२-१४ वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात आला आहे.
  • ५. १५-१८वयोगटातील मुलांना ५.८२ कोटी पहिला डोस आणि ४.१५ कोटी दुसरा डोस देण्यात आला आहे.