Dark Chocolate Liver Benefits For Liver Health :डार्क चॉकलेट आपल्या तीव्र चवीसाठी आणि मूड सुधारण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे, पण आता संशोधन असेही सांगते की ते यकृताच्या (लिव्हरच्या) आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. विशेषतः नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिजीज (NAFLD) मध्ये डार्क चॉकलेटचे मर्यादित सेवन यकृताची कार्यक्षमता सुधारण्यास आणि फॅट्स साचण्याची प्रक्रिया मंदावण्यास मदत करू शकते. डार्क चॉकलेटमध्ये पॉलीफेनॉल्स आणि फ्लॅवोनॉल्ससारखी संयुगे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे संयुगे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास आणि सूज नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतात.
नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिजीज म्हणजे काय?
नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिजीज (NAFLD) ही अशी समस्या आहे की ज्यामध्ये मद्यपान न करताही यकृतामध्ये अतिरिक्त फॅट्स साचतात.ही समस्या लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स(Insulin resistance) आणि मेटाबॉलिक सिंड्रोम (Metabolic syndrome) यांसारख्या कारणांमुळे होऊ शकते. योग्य वेळी लक्ष दिले नाही तर ही अवस्था नॉन-अल्कोहॉलिक स्टिअटोहेपेटायटिसमध्ये (Non-alcoholic steatohepatitis) रुपांतरित होऊ शकतो, ज्यामध्ये यकृतामध्ये सूज व पेशींचे नुकसान होऊ लागते. पुढे यामुळे सिरोसिस (Cirrhosis) किंवा यकृत निकामी होणे यांसारख्या गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते.
डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट गुणधर्म
डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल्स आणि फ्लॅवोनॉल्स(Polyphenols and flavonols) हे यकृतामध्ये होणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस(Oxidative stress कमी करण्यास मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे यकृतातील पेशींना हानी पोहोचते आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. हे घटक चयापचय सुधारण्यास, रक्ताभिसरण चांगले करण्यास आणि सूज कमी करण्यास उपयुक्त ठरतात.
सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये घट
एलिमेंटरी फार्माकोलॉजी अँड थेरेप्यूटिक्स (Elementary Pharmacology and Therapeutics) मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने NASH (नॉन-अल्कोहॉलिक स्टिअटोहेपेटायटिस) रुग्णांच्या शरीरात sNOX2-dp आणि आयसोप्रोस्टेन(Isoprostane) यांसारखे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर्स मोठ्या प्रमाणात कमी झाले. यावरून असे दिसून येते की,”डार्क चॉकलेट यकृताला ऑक्सिडेटिव्ह हानीपासून वाचविण्यात मदत करू शकते.
यकृतातील एंजाइममध्ये सुधारणा
सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका संशोधनात असे आढळले की,”दररोज ४० ग्रॅम डार्क चॉकलेट खाल्ल्याने प्लाझ्मा ८-आयसोप्रोस्टेन, अॅलेनिन अॅमिनोट्रान्स्फरेज आणि सोल्युबल NADPH ऑक्सिडेज 2 (NOX2) यांची पातळी कमी झाली. अॅलेनिन अॅमिनोट्रान्स्फरेजचे वाढलेले प्रमाण हे यकृताचे नुकसान झाल्याचे संकेत आहे. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी होणे म्हणजे यकृताच्या आरोग्यासाठी डार्क चॉकलेटचे सकारात्मक परिणाम दर्शवते.
यकृतसाठी योग्य डार्क चॉकलेट कसे निवडावे?
डार्क चॉकलेटचे फायदे मिळवण्यासाठी योग्य प्रकारची चॉकलेट निवडणे महत्त्वाचे आहे. यासाठी ७०% किंवा त्याहून अधिक कोको असलेली चॉकलेट निवडा, ज्यात फ्लॅवोनॉल्स जास्त आणि साखर कमी असते. शक्यतो ऑर्गेनिक व मिनिमली प्रोसेस्ड डार्क चॉकलेट निवडावे, जेणेकरून नैसर्गिक पॉलीफेनॉल्स सुरक्षित राहतील. खूप साखर, मिल्क सॉलिड्स किंवा अनहेल्दी फॅट्स असलेल्या चॉकलेटपासून दूर राहा, कारण ते यकृतासाठी घातक ठरू शकतात आणि वजन वाढवू शकतात.
डार्क चॉकलेट खाण्याची योग्य पद्धत
डार्क चॉकलेटचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. दररोज अंदाजे २०-४० ग्रॅम डार्क चॉकलेटचे सेवन यकृताच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. मात्र जास्त प्रमाणात सेवन केल्यास कॅलरीचे प्रमाण वाढू शकते आणि वजन वाढण्याचा धोका संभवतो, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या अधिक बिघडू शकते.