List of Bank Holidays in August 2022 : ऑगस्ट महिना आपल्या सर्वांसाठीच खूप खास असतो. या महिन्यात अनेक सण असतात. त्याचप्रमाणे या महिन्यात भरपूर सुट्ट्याही असतात. दरम्यान, भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) ऑगस्ट महिन्यांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये एकूण ११ दिवस बँका बंद राहतील. पुढील महिन्यात स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी यासारखे महत्त्वाचे सण आहेत. म्हणूनच जर तुमचे बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर ही यादी पाहून तुम्हाला तुमची कामं ठरवता येतील.

ऑगस्ट २०२२ महिन्यातील सुट्ट्यांची यादी :

  • ७ ऑगस्ट : पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • ९ ऑगस्ट : मोहरम (अगरतळा, अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर आणि रांची येथे बँका बंद राहतील.)
  • ११ ऑगस्ट : रक्षाबंधन (देशभरात सुट्टी)
  • १३ ऑगस्ट : दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
  • १४ ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • १५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
  • १६ ऑगस्ट : पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)
  • १८ ऑगस्ट : जन्माष्टमी (देशभर सुट्टी)
  • २१ ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • २८ ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • ३१ ऑगस्ट : गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील)

विविध बँकांची कामं ऑनलाइनही सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ