Dhantrayodashi Wishes In Marathi : कार्तिक महिन्यातील कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हिंदू धर्मानुसार हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सर्वजण आपल्या घरी धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात. धनत्रयोदशी हा सण व्यापारी वर्गासाठी विशेष असतो. या दिवशी सर्व व्यापारी वर्ग दुकानाची पूजा करतात. संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे.
तर यंदा हा सण १८ ऑक्टोबर २०२५ रोजी शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने तुमच्या जवळच्या मित्रांना, प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवा आणि WhatsApp, Facebook वर स्टेटससुद्धा शेअर करा.
धनत्रयोदशीनिमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा (Happy Dhantrayodashi Wishes In Marathi)
आनंदाने होईल सुरुवात,
संपत्तीचा होईल वर्षाव,
जीवनात तुम्हाला प्रत्येक सुख प्राप्त होवो,
लक्ष्मी देवी तुमच्या घरी सदैव वास करो,
धनत्रयोदशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश, कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

दिव्यांची रोषणाई आयुष्यात येईल लक्ख प्रकाश,
फराळाच्या गोडव्याने कुटुंबात वाढेल प्रेम-गोडवा,
धनत्रयोदशीच्या या शुभदिनी,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा,
धनत्रयोदशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

सुख, समृद्धी, शांती घेऊनी,
लक्ष्मी आली तुमच्या दारी,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
घरी लक्ष्मीचा वास राहो,
मोठ्या मंडळींची सदैव साथ असो,
ही धनत्रयोदशी आपणांस खास जावो…
धनत्रयोदशीच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!

लख लख दिव्यांनी उजळली ही निशा,
आनंदाने सजल्या दाही दिशा,
धनत्रयोदशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
रांगोळीचा रंग आणि दिव्याच्या तेजाने,
तुमचं आयुष्य उजळूदेत,
धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभूदे,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहू दे,
यश आणि समृद्धी तुम्हाला कायम मिळू दे,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

फुलाची सुरुवात कळीपासून,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून,
आणि
दिवाळीची सुरुवात आपल्या माणसांपासून,
धनत्रयोदशीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
लोकसत्ता डॉट कॉमकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा…