Dhulivandan Wishes In Marathi : होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन (Dhulivandan) हा सण ही फार जल्लोषात साजरा केला जातो. प्रत्येकजण एकमेकांना रंग लावून, पिचकारीतून पाणी उडवून हा रंगांचा सण साजरा करत असतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या सणासाठी खूप उत्साही असल्याचे दिसून येते. तर हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी रंगांसह होळी खेळली जाते, ज्याला मराठीत धुलिवंदन असे म्हणतात. तर धुलिवंदनाच्या तुमच्यापासून लांब राहणाऱ्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांचा दिवस तुम्हाला रंगीत करायचा असेल तर तुम्ही पुढील शुभेच्छा (Dhulivandan 2025 Wishes) त्यांना पाठवू शकता.

धुलीवंदन सणाच्या शुभेच्छा आणि संदेश (Dhulivandan 2025 Wishes)

कटाची आमटी, पुरणपोळी देऊन
मिटवूया एकमेकातला वाद
रंगवू एकमेकांना सप्तरंगात
धुलिवंदनाचा सण एकत्र करू साजरा

भिजुदेत अंग, गुलाबी रंगाने रंगुदेत अंग
नाचण्यात होऊदेत मन दंग
पिचकारीत भरून सारे रंग
धुलिवंदनाला जोडू प्रेमाचा रंग

पाणी वाचवा
नैसर्गिक रंग वापरा
कोणालाही ईजा न पोहचवता
धुलिवंदन करू एकत्र साजरा

हातात पिचकारी
गालावर रंगीबेरंगी रंगाची लाली
या धुलिवंदनाला होऊदेत पूर्ण तुझ्या सगळ्या इच्छा
धुलिवंदनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

क्षणभर विसरून जाऊ दुःख जीवनातले
टेन्शन विसरून रंगात खुलूदेत प्रेम तुमच्या आयुष्यातले.

रंग प्रेमाचा
रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा
नव्या उत्साहात साजरा करू सण धुलीवंदनाचा.

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाळा
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला.

एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करूया सण धुलीवंदनाचा.

सोडूनी भेद नी भाव,
विसरुनी दुःखे नी घाव,
प्रेमरंग उधळूया चला…
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आला होळीचा सण लय भारी चल नाचूया
एकच रंग लावून पर्यावरण पूरक होळी खेळूया
धुलिवंदनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला सर्वांना धुलिवंदनाचा हा सण (Dhulivandan 2025) आनंदात जावो. सुरक्षित राहा व इतरांची काळजी घ्या आणि हो वरील शुभेच्छा तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका.