जगभरामध्ये कोट्यावधी लोकांना टाईप २ मधूमेह आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढणे असा आजार आहे जो झाल्यास हळू बळू शरीर कमकूवत होत जाते आणि नुकसान पोहचवते. शरीरामध्ये रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर त अनेक आजार होण्याचा धोका वाढतो.

खरं तर टाईप २ मधूमेह आजारामध्ये शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन निर्माण करू शकत नाही ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे त्याचे निंयत्रण करण्यासाठी औषध, आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक असते पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारा कांदा मधूमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

तज्ज्ञांच्या मतानुसार, रोजच्या दिनचर्येमध्ये छोटे छोटे बदल दिर्घकाळापर्यंत मोठे फायदे देऊ शकतात. कांदा रोजच्या आहारात समाविष्ट केल्याने स्वस्त, सहज उपलब्ध होणार आणि प्रभावी पद्धत ठरू शकतो जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतो, कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट आणि मेटाबॉलिक हेल्थ सुधारण्यासाठी मदत करतो.

संशोधनात काय समोर आले?

अमेरिकेतील एंडोक्राइन सोसायटीच्या ९७ व्या वार्षिक बैठकीत सादर केलेल्या अभ्यासानुसार, मधुमेह असलेल्या उंदरांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, कांद्याचा अर्क, मधुमेहविरोधी औषध मेटफॉर्मिनबरोबर दिल्यास, रक्तातील साखरेची पातळी ५०% पर्यंत कमी होते. इतकेच नाही तर कांद्याचा अर्क एकूण कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करतो. या संशोधनानुसार, तुमच्या दैनंदिन आहारात कांदे समाविष्ट केल्याने नैसर्गिकरित्या रक्तातील साखर नियंत्रण आणि हृदय आरोग्य दोन्हीला मदत होऊ शकते.

मधुमेही रुग्णांसाठी कांद्याचे फायदे

कांदे केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर त्यात असलेले अनेक जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. कांद्यामध्ये सल्फर संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारून रक्तातील साखर स्थिर करण्यास मदत करू शकतात.

कोलेस्टेरॉल नियंत्रण

संशोधनानुसार, कांद्याच्या अर्काने मधुमेही उंदरांमध्ये एकूण कोलेस्टेरॉल देखील कमी केले. उच्च कोलेस्टेरॉल मधुमेही रुग्णांना हृदयरोगाचा मोठा धोका असतो. अभ्यासात असे आढळून आले की,कांद्याच्या अर्काने ४०० मिलीग्राम/किलो आणि ६०० मिलीग्राम/किलोच्या उच्च डोसमध्ये कोलेस्टेरॉल सर्वात जास्त कमी केला.

चयापचय आरोग्यात सुधारणा

कांद्यात कॅलरीज कमी असतात, परंतु ते चयापचय दर वाढविण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात मदत होऊ शकते.

आहारात कांद्याचा समावेश करण्याचे मार्ग

मधुमेहाचे रुग्ण त्यांच्या आहारात कांद्याचा अनेक प्रकारे समावेश करू शकतात. सॅलड, सँडविच किंवा रायत्यामध्ये कच्चा कांदा घाला. ते कुरकुरीत चव आणि पोषण दोन्ही देईल. कांदा हलके तळून घ्या आणि सूप, भाज्या किंवा तेलात परतून ध्या. तेलात परतून किंवा भाजून जेवणाबरोबर कांदा खाऊ शकता. याशिवाय कांदे बारीक करून चटणी, सॉस किंवा डिप्स म्हणून खाऊ शकता. तज्ज्ञांच्या मते, कांदा खाल्ल्याने केवळ रक्तातील साखर नियंत्रित करता येत नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.